*महाराष्ट्रात तीन कृषी कायद्याच्या विरोधात काळे झेंडे लावून प्रहारनी पाळला निषेध दिन*
वर्धा – केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी विरोधी कायदे रद्द व्हावे यासाठी मागच्या सहा महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. 26 मे रोजी मोदी सरकारला 7 वर्षे पूर्ण होत आहे शेतकरी विरोधी कायदे करणाऱ्या मोदी सरकारच्या निषेध म्हणून आज मोदी सरकारच्या निषेध म्हणून 26 मे रोजी महाराष्ट्राचे जलसंपदा, शिक्षण,कामगार व महिला व बालकल्याण राज्यमंत्री व प्रहार जनशक्ती पक्षाचे सरसेनापती नामदार बच्चूभाऊ कडू यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत विदर्भातील सर्व शेतकरी,शेतमजुर,व प्रहार सेवकांनी आपआपल्या घरावर व शेतीवर काळा झेंडा लावून निषेध नोंदवला वर्धा जिल्ह्यातही सर्व तालुक्यात प्रहारचे सर्व पदाधिकारी जिल्हाप्रमुख,उपजिल्हाप्रमुख,तालुका प्रमुख, शहर प्रमुख,शाखा प्रमुख यांनि गावागावात काळे झेंडे लावून निषेध नोंदवला
रुग्णमित्र- गजु कुबडे
पूर्व विदर्भ प्रमुख
व
संपर्क प्रमुख
वर्धा,नागपूर,चंद्रपूर,गडचिरोली जिल्हा