*दोन तरुणांना चिरडणारा कारचालक आरोपी मध्यरात्री उशिरा पर्यंत पाटणसावंगीच्या ढाब्यावर!*
*पोलीसांच्या तपासात आरोपींची कबुलीमुळे अवैधरित्या ढाबा संचालकांचे पीतळ उघड…*
*कोरोना काळात ढाबा सुरू ठेवण्याची परवानगी दिली कुणी?*
*पोलीसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह…?*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेरः तालुक्यातील दहेगाव (रं) महाराजा लॉन परिसरात दोन दुचाक्यांना जबर धडक देऊन दोन तरुणांना चिरडणारा कारचालक आरोपी संकेत ढोक व त्याचा मित्र रवी वैष्णव हे घटनेच्या दिवशी मध्यरात्री उशिरा पर्यंत पाटणसावंगी परिसरातील आर.डी.ढाब्यावर जेवन व मद्यपान करत बसले असल्याची माहिती आरोपींनी पोलीसांच्या तपासा दरम्यान कबुली दिली.
एकीकडे संपूर्ण राज्यात लॉक डाऊन सुरू असतांना मध्यरात्री उशिरा पर्यंत ढाबा सुरू करण्याचे आदेश दिले कुणी? असा प्रश्न निर्माण झाला असून पोलीसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न चिन्ह निर्माण होत असुन पोलीस विभाग का गोर गरिब व चुकीने विनामास्क फीरणार्यावर दंडुकशाही करण्याकरीताच आहे का असा सवालही आता उठू लागला आहे.
२४ में मध्यरात्री सोमवारला मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास दहेगाव (रं) खापरखेडा राष्ट्रीय महामार्ग महाराजा लॉन परिसरात बेधुंद मद्य प्राशन करून भरधाव वेगाने येणारा कारचालक संकेत ढोक रा गावंडे ले आउट झिंगाबाई टाकळी नागपूर याने दोन दुचाक्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली यावेळी त्याचा मित्र रवी वैष्णव सोबत होता सदर धडकेत सुरेश चौधरी व हर्षल बनोदे यांचा मृत्यू झाला तर त्यांचे तीन मित्र गंभीर जखमी झालेत तर दोन मित्र थोडक्यात बचावले.
देशासह राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्य सरकारने लॉक डाऊनची घोषणा केली आहे त्यामूळे अत्यावश्यक सेवे व्यतिरिक्त सर्व प्रकारची दुकाने बंद आहेत मात्र पाटणसावंगी पोलीस चौकी अंतर्गत असलेल्या आर.डी ढाबा व इतर उपहारगृह मध्यरात्री उशिरा पर्यंत बिनधास्त सुरू आहेत त्यामूळे जयभोले नगर व चनकापूर परिसरातील दोन तरुणांना चिरडणारा आरोपी कारचालक आरोपी संकेत ढोक व त्याचा मित्र रवी वैष्णव रात्री ८.३० च्या सुमारास आर. डी.ढाब्यावर गेले होते आणि मध्यरात्री उशिरा पर्यंत जेवण व मद्य प्राशन करीत बसले होते याला आरोपी संकेत ढोक व त्याचा मित्र रवी वैष्णव यांनी खापरखेडा पोलिसांच्या तपासात दुजोरा दिला आहे त्यामूळे मध्यरात्री उशिरा सुरू ठेवणाऱ्या आर.डी.ढाबा मालकाला अभय कुणाचे? व सावनेर पोलीसांची हिच काय त्यांची कार्यप्रणाली असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पाटणसावंगी पोलीस चौकी अंतर्गत ढाबे, उपहारगृह, चहाटपरी मध्यरात्री पर्यंत सुरू असतात याची माहिती मृतक सुरेश व हर्षल आणि त्यांच्या मित्रांना माहीत असल्यामूळे ते सदभावना नगर पाटणसावंगी परिसरात चहा व मॅगी खाण्यासाठी गेले असल्याची माहिती मिळाली आहे शिवाय काही ढाब्यावर बिनधास्त खोल्या उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे त्यामूळे शहरातील आंबड-शौकीन लोकांचे लोंढे बघायला मिळत आहे परिणामी राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या मध्यरात्री पर्यंत रांगा दिसून येतात.
*पाटणसावंगी परिसरात पोलीस चौकी स्थापन करण्यात आली आहे मात्र ती नावालाच आहे. मध्यरात्री उशिरा पर्यंत पाटणसावंगी परिसरात ढाबे सुरू असतात याची कल्पना पोलीसांना नसणे हे समजण्या पलीकडे आहे.*
*मध्यरात्री पर्यंत सुरू असलेले ढाबे मृतक सुरेश व हर्षलच्या मृत्यूला कारणीभूत आहेत तरुण वयात त्यांच्यावर मृत्यू ओढवल्यामूळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाच डोंगर कोसळलं आहे याला जबाबदार कोण? याची चौकाशी करून दोषींवर कार्यवाही अपेक्षित आहे.मात्र आर्थिक लाभापोटी कार्यवाही करण्यात येत नाही अशी माहिती मिळाली आहे सदर प्रकरणात ग्रामिण पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी लक्ष घालून कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात येत असुन आपल्या कर्तव्यदक्षतेला बगल देत असलेल्या जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांवर योग्य कारवाई व्हावी अशीही मागणी जोर घरू लागली आहे.*
*आरोपी संकेत ढोक याला अटक करून त्यांचा मित्र रवी वैष्णव याला ताब्यात घेतले असता अपघात होण्यापूर्वी पाटणसावंगी परिसरातील आर.डी.धाब्यावर जेवण व मद्य प्राशन केल्याची माहिती दिली अपघाताचे घटनास्थळ खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीत आहे मात्र अपघाता पूर्वी आर.डी. ढाब्यावर बसले होते सदरचा परिसर खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीत येत नसल्यामूळे कार्यवाही करण्याचे अधिकार नाहीत.*
*पोलीस उपनिरीक्षक मनोज मेश्राम पुढील तपास करित आहे*