*हंगाम पुर्वी शेतकर्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्या – सलील देशमुख*
*सलिल देशमुख शेतकर्यांसह पोहचले बैंकेत*
कोंढाळी प्रतिनिधि – दुर्गाप्रसाद पांडे
कोंढाळी- खरीप हंगामापुर्वी शेतकर्यांना सहज कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून शासनाने आदेश काढून बैंकेंना सुचना दिल्या आहेत. या सुचनांचे पालन योग्य रित्या करून शेतकर्यांना पीक कर्ज वेळेवर मिळावे म्हणून नागपुर जिल्हा परिषद चे सदस्य सलील देशमुख यांनी काटोल तालुक्यातील कोंढाळी-काटोल व पारडसिंगा येथील राष्ट्रीयकृत व जिल्हामध्यवर्ती बैंकां मधे पोहचून शेतकर्यांच्या समस्या समजावून घेतल्या. 28मे रोजी दुपारी 12-00ब
वाजताचे दरम्यान कोंढाळी येथील बैंक आफ इंडीय येथे पोहचून पीक कर्ज घेण्यास उपस्थित शेतक्यांशी चर्चा केली. या नंतर कोंढाळी येथील बैंक आफ इंडीय चे व्यवस्थापक सौमित्र डे यांचे कडून कोंढाळी येथील बैंक आफ इंडीय चे माध्यमातून पीक कर्ज घेणार्या शेतकर्यां ना पीक कर्ज वाटपाचे लक्षांक व वाटप झालेले पीक कर्जा बाबद माहीती घेतली असता , या बैंकें मार्फत मागील वर्षी 882शेतकर्यांना साढे आठ कोटीचे पीक कर्ज वाटप करण्यात आले होते. यात तत्काल पीक कर्जाचे माध्यमातून ही278शेतकर्यांना सव्वा कोटी चे कर्ज देण्यात आले होते, अशी माहीती बैंक व्यवस्थापकांनी दिली. तसेच या पैकी या वर्षी 26मे पर्यंत 105शेतकर्यांनी नुतनीकरण केले असुन यांना एक कोटी चे पीक कर्ज वाटप करण्यात आले असुन
नवीन पीक घेणारे शेतकर्यानी पीक कर्जाला लागनारी कागद पत्र जमा करून गरजू शेतकर्यां ना ताबडतोब पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाईल असे बैंक व्यवस्थापकांनी सलील देशमुख व उपस्थित शेतकर्यांना सांगितले, या प्रसंगी उपस्थित शेतकर्यांच्या समस्यांचे समाधान केल्यावर 12-30वाजता स्टेट बँक ऑफ इंडिया कोंढाळी येथे ही पोहचले.
या प्रसंगी कोंढाळी चे सरपंच केशवराव धुर्वे, उपसरपंच स्वप्निल व्यास, ग्रा प सदस्य संजय राऊत, रा का चे डाॅ अनिल ठाकरे,नितीन ठवळे, प्रशांत खंते, आकाश गजबे, व अनेक पदाधिकारी कोविड 19च्या नियमावली चे पालन करत शेतकरी व बैंक अधिकार्यांशी संवाद साधला.