*नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त भोजन दान*
नागपुर – नागपुर शहराचे नाव संपूर्ण विश्वात लौकिक करणारे भारतीय जनता पक्षाचे माजी केन्द्रीय अध्यक्ष,केन्द्रीय मंत्री मा.नितीनगडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त नागपुर जिल्हाच नव्हेतर संपूर्ण देशात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते विविध आयोजन करुण साहेबांचावाढदिवस उत्साहात साजरा करीत आहे.
सर्वांचे प्रेरणास्रोत व लाडके नेते मा.आदरणीय नितीनजी गडकरी साहेब (केद्रीय वाहतूक मंत्री) यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज दक्षिण नागपूरचे आमदार मा. मोहन मते यांच्या हस्ते सुपर हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटल आणि मेडिकल येथे (भोजनदान )जेवण वाटप करण्यात आले, यावेळी नागपुर शहर महिला अध्यक्ष नीताताई ठाकरे,प्रितीताई राजदेरकर,महिला आघाडी अध्यक्ष ज्योतीताई* *देवघरे,मंडळाच्या महामंत्री जोत्सना इंगळे,गीता इल्लूकर, किर्ती शेंडे,पुष्पा राऊत, संपूर्ण नगरसेविका,वार्ड महिला अध्यक्ष,उपाध्यक्ष तसेच सर्व कार्यकर्ता उपस्थित होत्या.