*लक्कडकोट गावाजवळ मिळाली बुद्ध मूर्ती*
आवारपूर प्रतिनिधि- गौतम धोटे
कोरपना तालूका लगतच राजुरा तालुक्यातील असिफरोडला असलेल्या लक्कडकोट गावाजवळ मुख्य रस्त्याच्या कडेला गायत्री मंदिराजवळ आज बुद्ध मूर्ती मिळाली.
लक्कडकोट येथील गावालगत गौतम बुद्धाची मुर्ती मारोती कोटनाके,जंगुगुडा या मुलास मूर्तीचा वरील भाग दिसला. कुतूहलाने खोदकाम केले असता ती एक बुद्ध मूर्ती मिळाली. या बुद्ध मूर्ती मूळे तालुक्यातील बौद्ध बांधवांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून ती मूर्ती पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक येत आहेत. त्या बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना कोठे करण्यात येईल हे बातमी लिहेपर्यंत स्पष्ट झाले नाही येवढे मात्र खरे.असले तरी चंद्रपूर जिल्हात बऱ्याच भागात गौतम बुध्दाचां मुर्ती असल्यांचा भास /असून संबंधीत प्रसाशनाने लक्ष लावण्यांची मागणी होत आहे.