*बेवारस कुत्र्यांना जंगलात सोडण्याची मागणी*
*मागील दहा ते पंधरा दिवसापासुन ५० नागरिकांवर कुत्र्यांनी केला हल्ला*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान शहरात व परिसरात गेल्या अनेक वर्षापासुन शहरात बेवारस कुत्र्यांच्या आतंक चांगलाच पसरल्याने किती तरी लोक बेवारस कुत्र्यांच्या शिकार होऊन दुखापतशी झुंझत असुन नगरपरिषद प्रशासना ला वारंवार निवेदन देऊन ही कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्याने शहरातील नागरिक आज ही बेवारस कुत्र्यांच्या शिकार होत असल्यामुळे कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी मंच उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर यांचा नेतृत्वात नप मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे यांना भेटुन चर्चा करुन निवेदन देऊन तात्काळ उपाय योजना करुन बेवारस कुत्र्यांना पकडुन जंगलात सोडण्याची मागणी करण्यात आली आहे .
कन्हान-पिपरी नगरपरिषद होऊन सहा वर्ष झाल्या वर ही ३८ हजारांच्या आसपास असलेली दाट लोक संख्येचे शहर असल्यावरही मुलभुत सुविधांचा मात्र सर्वत्र अभाव दिसत आहे. यातीलच एक भीषण समस्या म्हणजे बेवारस कुत्र्यांच्या दररोज कुठे न कुठे होत असलेल्या हल्यांची गेल्या किती तरी वर्षापासुन ही समस्या असल्यावरही नगरपरिषद प्रशासन याकडे लक्ष देत नाही आहे. कुत्र्यांच्या हल्यात आजवर लहान मुलांन पासुन वयोवृद्धांपर्यंत शेकडोच्या संख्येत लोक आज ही बेवारस कुत्र्यांच्या शिकार होत आहे. दुखापत मध्ये सर्वाधिक प्रमाण अत्यंत गरीब नागरिकांचे आहे. जे लोक रोज मजुरी करुन आपल्या जीवनाचा गाळ हाकताहेत अश्या या गंभीर परिस्थितीत गरीब नागरिकांना नगरपरिषद प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना दुखापतीने मानसिक व उपचार करण्याकरिता आर्थिक खर्चाचा त्रास सहन करावा लागत आहे. शहरात गेल्या १० ते १५ दिवसापासुन बेवारस कुत्र्यांनी नागरिकांवर हल्ले सुरु केल्याने तुकाराम नगर , पटेल नगर , एम जी नगर , राधाकृष्णन नगर, स्वामी विवेकानंद नगर सह अनेक विविध नगरात राहणार्या ५० पेक्षा जास्त लोकांवर बेवारस कुत्र्यांनी हल्ले केल्या मुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी मंच उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर यांच्या नेतृत्वात नप मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे यांना भेटुन या विषयावर चर्चा करुन तात्काळ उपाय योजना करुन बेवारस कुत्र्यांना पकडुन जंगलात सोडण्याची मागणी केली आहे. या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रविण गोडे, उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव प्रदीप बावने, कोषाध्यक्ष हरीओम प्रकाश नारायण, सदस्य प्रविण माने, शाहरुख खान, प्रकाश कुर्वे सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते.