*केदारांच्या विरोधात कोण…?*
(सुनील केदार)
*भाजप की – सेना *
(डॉ.राजीव पोतदार)
(रामराव मोवाड़े)
(उत्तम कापसे)
मुख्य संपादक- किशोर ढुंढेले (सावनेर)
*सावनेरः – होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीचे नामांकन दाखल करण्याकरिता शेवटचे चार दिवस शिल्लक असुन सुध्दा सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस चे विद्देमान आमदार सुनील केदार यांच्या विरुद्ध कोण निवडणूक लढणार भाजप की शिवसेना या दोन्हीही पक्षात अद्याप युती बद्दल वाटाघाटी सुरु असल्याने नक्की उम्मेदवारी मीळणार तरी कुणाला अशी संभ्रमाची स्थिती निर्माण झाली असल्याचे चित्र आहे तर काँग्रेस पक्षाने आपल्या पहिल्याच यादीत विद्देमान आमदार सुनील केदार यांना अधिकु्त उम्मेदवार घोषित केले असल्याने त्यांनी मोर्चे बांधनीला वेगाने सुरुवात केली आहे तर दुसरी कडे अद्याप उम्मेदवार निश्चित नसल्याने मात्र भाजप व शिवसेना उम्मेदवारांना वाट बघण्या खेरीज दुसरा मार्ग नाही*
*सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रावर भाजप चा दावा*
*मिळालेल्या विश्वस्त सुत्रा नुसार सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रावर भाजप नी आपला दावा केला असुन कोणत्याही परिस्थितीत ही जागा सोडण्याची त्यांची तयारी नसल्याचे बोलल्या जात आहे.भाजपचे नागपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष डॉ राजीव पोतदार मागील अनेक वर्षापासून सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रात घाम गाळुन एक एक कार्यकर्त्याला भेटून आपली ताकत वाढवत आहे तर मागील निवडणुकीत तांत्रिक त्रुटीमुळे ऐनवेळी नामांकन अर्ज रद्द होण्याची नामुश्की उराशी बिळगुन या निवडनुकीत त्याचा वाचपा काढण्याच्या तयारीला लागलेले सोनबा मुसळे,नगर पालीका,ग्राम पंचायत निवडणुकीत अनेक ठीकाणी पुढाकार घेऊण भाजप चे उम्मेदवार निवडून आनण्याकरिता अथक परिश्रम घेणारे युवा नेते रामराव मोवाडे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश मानकर,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नितीन राठी,अँड्. प्रकाश टेकाडे सारखे कद्दावर नेते भाजप चे तिकीट प्राप्ती करीता रांगेत असून पक्षश्रेष्ठी ज्याला उम्मेदवारी देईल त्याचे काम निर्वीवाद रुपाने करून सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रात भाजप चा आमदार निवडून आण्यास तत्पर आहेत तीथेच सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रातील आदासा येथील रहवासु दक्षिण नागपूर चे आमदार सुधाकर कोहळे यांचे ही नाव मागील दोन दिवसापासून चर्चेत आहे..*
*शिवसेनेचा हट्ट*
*सावनेर कळमेश्वर विधानसभेत मागील निवडनुकीत शिवसेनेला 75 हजाराच्या वर मते मिळाली होती.त्या अनुशंगाने प्रबळ दावेदारी म्हणून मागील निवडनूकीत विद्देमान आमदार सुनील केदार यांना थोडश्या मताने विजय संपादन करण्यास विवश करणारे जिवतोडे यांचे नाव जरी शिवसेनेच्या यादीत अव्वल असले तरी उत्तम कापसे,अशोक झिंगरे व नव्याने ऐकू येणारे नाव म्हणजे किशोर कन्हेरे यात उम्मेदवारी मीळविन्या करीता रस्साखेच सुरु आहे.*
*भाजप सेनेचे उम्मेदवार अद्याप निश्चित न झाल्याने किंतू परंतु चे पर्व रंगत आहे.राजनैतीक जानकारांच्या मते जर सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्र हे शिवसेनेच्या वाट्यास जाण्याची शक्यता आहे त्याल मुख्य कारण म्हणजे भाजप पक्षाचे तिकीट प्राप्ती करीता असलेली लांब रांग “याला दीली तर तो नाराज” अश्या स्थितीत पक्षात सलोख्याचे वातावरण ठेवण्या करीता भाजप पक्षश्रेष्ठी स्थानिक कार्यकर्ते यांच्या हट्टाला तीलांजली देऊण सावनेर कळमेश्वर विधानसभा शिवसेने करीता सोडू शकते असे बोलल्या जात आहे.अश्यात केदारांच्या विरोधात कोण अश्या चर्चा रंगु लागल्या आहेत.4 आक्टोंबर ही नामांकनाची अंतीम तिथी असल्या मुळे दोन अथवा तीन आक्टोबर पर्यंत हा गुंता उलगडेल असे दीसुन येत नाही.*
*जातीय समिकरणाचे कोणत्याही निवडनुकीत वेगळेच महत्व असते त्यानूसार सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रात निर्णायक मते ही कुणबी समाजाचे असल्याने भाजप व शिवसेने आपला उम्मेदवार निवडतांना याकडे लक्ष देउणच आपला उम्मेदवार निश्चित करतील असे जानकारांचे मत आहे*