*बोडखा मोकशी येथे अहिल्याबाई होळकर जयंती साजरी*
वरोरा प्रतिनिधि – जुबेर शेख
वरोरा – अनेक मोठे निर्णय घेऊन ते अंमलात आणले गेले यामुळे अहिल्याबाईं विषयी लोकांच्या मनात आदराची भावना निर्माण झाली. यामुळेच दरवर्षी ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहाने साजरी केली जाते. आज त्यांची २९६ वी जयंती साजरी करण्यात आली.
त्यावेळी बोडखा मोकाशी येथील समस्त अहिल्याभक्त युवक, महिला उपस्थित होते. त्यावेळी प्रास्ताविक गणेश चिडे यांनी केले व आभार प्रदर्शन प्रदीप तुराळे यांनी केले त्यावेळी महिलांचा सहभाग जास्त होता. यावेळी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास सांगण्यात आला. राजेंद्र तुराळे, दिलीप तुराळे,शेखर झिले, सचिन चिडे, वैभव तुराळे, परमेश्वर तुराळे, पुरोषोत्तम तुराळे, गजानन तुराळे, चेतन तुराळे, सुरज तुराळे, रेखाताई चिडे, सुनंदा तुराळे,मंगला तुराळे, माला चिडे, सोनू तुराळे, संगीता तुराळे तसेच समस्त अहिल्याभक्त उपस्थित होते.