*ओबीसी मोर्चा व्दारे जनआक्रोश आंदोलन*
*भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा नागपूर तर्फे आज जनआक्रोश आंदोलन उभारण्यात आले आहे*
नागपुर – भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा नागपूर जिल्हा व नागपूर महानगर तर्फे ओबीसीला राजकीय आरक्षण मिळावे या करिता आज दिनांक 03 जून 2021 गुरुवार ला सकाळी 10-00 वाजता स्व. गोपीनाथजी मुंडे यांच्या ( जयंती निमित्त) प्रतिमेला माल्यार्पण करून संविधान चौक नागपूर येथे जनआक्रोश आंदोलनाची सुरवात करण्यात येईल आंदोलनानंतर मा जिल्हाधिकारी नागपूर यांना निवेदन देण्यात येईल.
तरी नागपूर जिल्हा ओबीसी कार्यकारणी पदाधिकारी सदस्य तालुका ओबीसी पदाधिकारी व ओबीसी सरपंच,आजी माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य नगरपरिषद सदस्य व ओबीसी नेते मंडळींनी उपस्थित राहावे अशी वीनंती अँड प्रकाश टेकाडे अध्यक्ष ओबीसी मोर्चा नागपूर जिल्हा यांनी केली आहे.