*पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी*
सावनेर प्रतिनिधि – दिनेश चौरासिया
सावनेर : सावनेर तहसील कार्यालयात 31 मे 2021 सोमवारला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली सन 2020 मध्ये राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यांची जयंती राष्ट्रीय दिनाचे कार्यक्रम सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयास साजरी करण्यात यावे अशा प्रकारचे शासन परिपत्रक क्रमांक ज पुती 22/9 /प्रक 71 /29 दिनांक 12 डिसेंम्बर 2019 रोजी काढन्यात आले त्यानुसार हा कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रमाचे अध्यक्ष तहसीलदार सतीश मासाळ यांनी सर्वप्रथम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेची पूजाअर्चा करून माल्यार्पण केले यानंतर अन्य मान्यवरांनी सुद्धा प्रतिमेला पुष्प अर्पण केले प्रसंगी तहसीलदार सतीश माता धनगर समाज संघटनेचे पदाधिकारी प्रा बाबा टेकाडे नायब तहसीलदार चैताली दराडे नायब तहसीलदार गजानन जवादे शरद नांदुरकर जयसिंग राठोड सुजित आडे प्रफुल वडे विठ्ठल खाटीककर प्रामुख्याने उपस्थित होते।