*विजेच्या लपंडावाने आवारपूर परिसरातील नागरिक त्रस्त*
कोरपना प्रतिनिधि – गौतम धोटे
कोरपना – आदिवासी बहूल तालुक्यातील आवारपूर परिसरातील तथा बऱ्याच ग्रामीण भागातील अवकळा विजेचा लपंडाव सतत सुरू असतो. दिवसभरात अवेळी खंडित होतो . त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे .परिसरातील सांगोळा.हिरापुर.नादाफाटासह परिसरातील सतत विजपुरवठा खंडित होत असल्याने विज उपकरणांमध्ये बिघाड निर्माण होऊन नागरिकांना आर्थिक भूर्दंड ही सहन करावा लागतो .तसेच विज विभागाकडून महिण्याकाठी मिळणाऱ्या देयकांची रक्कमही अवाजवी येत असल्याने नागरिकांतून रोष व्यक्त केला जात आहे .महिन्याकाठी नियमित विजबिलाचा भरणा केल्यानंतरही योग्य विजपुरवठा होत नसल्याने विज विभागाच्या कार्यप्रणालिवर बादा अन् नाराजी व्यक्त केली जात परिसरातील नागरिकांना ताप .खोकला आदीनी नागरिक या आजारींनी फंनफनत आहेत .अशावेळी विज खंडीत आहे .