*कन्हान ला अहिल्याबाई होळकर यांची जयंती विविध संघटने द्वारे थाटात साजरी*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान – पिपरी नगरपरिषद व कन्हान शहर विकास मंच द्वारे अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन व पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करीत अहिल्याबाई होलकर यांची जयंती थाटात साजरी करण्यात आली.
सोमवार (दि.३१) मे २०२१ ला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्य कन्हान – पिपरी नगरपरिषद कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करून मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. नगरसेवक राजेश यादव व राजेंन्द्र शेंदरे यांनी अहिल्याबाई होळकर यांचा जिवन कार्यावर उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास उपस्थित सर्व नप अधिकारी व कर्मचार्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करीत जयंती थाटात साजरी केली. याप्रसंगी नप मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे, कार्यालय अधिक्षक सुशांत नरहर, इजिनीअर मुकलवार, नगरसेवक राजेश यादव, राजेंन्द्र शेंदरे, अकाऊंटन खवसे, बिसेन, दिनेश विश्वकर्मा, मोहनसिंग या़दव, लकेश माहातो, भिमराव मेश्राम सह आदि न प अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
शहर विकास मंच कन्हान
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्य कन्हान शहर विकास मंच द्वारे मंच अध्यक्ष प्रविण गोडे यांचा हस्ते अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. सर्व मंच पदाधिकार्यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करून जयंती थाटात साजरी करण्यात आली. याप्रसंगी कन्हान शहर विकास मंच अध्यक्ष प्रविण गोडे, उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव प्रदीप बावने, कोषाध्यक्ष हरीओम प्रकाश नारायण, शाहरुख खान सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते.