*कन्हान येथे युवकांनी केला पेट्रोल दरवाढी चा विरोध*
*पेट्रोल शंभर रूपये पार हाय हे जनतेवर मार*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – पेट्रोल चे भाव दिवसेन दिवस वाढत असुन शंभर रूपयाच्या पार झाल्याने सर्वसामान्य नागरिकात सरकार विरूध्द आक्रोश वाढल्याने यात प्रामुख्याने युवकांनी सामोर येऊन कन्हान येथील पेट्रोल पंप, तारसा रोड चौक, आबेंडकर चौक या ठिकाणी हातात फलक घेऊन पेट्रोल दरवाढीचा विरोध प्रदर्शन करून महागाई कमी करण्याची मागणी करण्यात आली.
महागाई व पेट्रोल दरवाढ दिवसेन दिवस वाढत असुन सुध्दा आता कुठलाही राजकीय पक्ष सामोर येत नसल्याने लोकांचा आक्रोश हा सरळ वाढुन महागाईने सर्वसामान्याचे कंबरडे मोडले जात आहे. अश्या वेळी युवकांनी या महागाईचा विरोध करायलाच हवा कारण सुशिक्षित वर्ग जेव्हा प्रश्न करेल तेव्हाच मोट्या पदावर बसलेल्या अनपढ लोकांना जवाब देण्यास भाग पाडता येईल.
याकरिता युवकांनो हे पेट्रोल फक्त विरोधी पक्ष साठीच नाही वाढलेलं आहे. हे सगळयाच जनतेचे शोषण करणारा आहे. आणि आता जर आपण याचा विरोध नाही केला तर आपण आपल्या येणार्या पिडीला महागाई च्या सत्तेत सॊडणार आहो. आणि याचा परिणाम अराजकतेकडे होऊन सर्वसामान्य लोकांचा चुराडा होणार आहे. यास्तव कन्हान येथील आंबेडकर चौक, तारसा चौक आणि कन्हान पेट्रोल पम्प येथे युवकांनी पेट्रोल दरवाढी चा हातात फलक घेऊन विरोध दर्शविला आहे. यात प्रामुख्याने केतन भिवगडे, अभिजित चांदुरकर, श्यामभाऊ मस्के, रितेश जनबंधु, संदीप भोयर, महेश धोंडगे, आकाश सोनबावणे, नितीन मोहने, सचिन जामकर सह आदि युवक उपस्थित होऊन पेट्रोल दरवाढीचा विरोध करून महागाई कमी करण्याची मागणी केली आहे.