*खेडी येथे वर्गणीतुन पांधन रस्त्याचे मातीकाम केले*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – खेडी गट ग्राम पंचायत येथील शेतकर्यांना वहिवाट करण्याकरिता अडचण होत असल्याने येथील शेतकर्यांनी वर्गणी करून स्व खर्चाने १ कि.मी पांधन रस्त्याचे मातीकाम करून रस्ता तयार करण्यात आला.
बुधवार (दि.२७) मे ला खेडी येथील शेतकर्यांनी शेतकाम करण्यास ये-जा करण्याकरिता अडचण निर्माण होत असल्याने खेडी ग्राम पंचायत अंतर्गत रंगरावजी ठाकरे यांच्या शेतीपासुन ते नंदुजी इंगळे च्या शेतीजवळुन रामटेक पांधन रस्त्याला जोडणारी १ कि मी पांदण रस्त्याचे मातीकाम ३५ हजार रू वर्गणी करून स्व खर्चाने करण्यात आले . या पांधन रस्ता कामाकरिता रामटेक विधान सभेचे आमदार आशिष जैस्वाल, रंगरावजी ठाकरे, शंकरराव काळे, राजुजी पुंड, मनोज कडु, संजय वैद्य, दिलीप ढोले, हेमराज वैद्य, सुशिल ठाकरे, सुरेश वैद्य, नारायणजी ठाकरे, अंगद हुड, विष्णुजी ठाकरे, गंगाधर ठाकरे, पुरुषोत्तम हुड आदि ने आपल्या ईच्छेने शक्तीनिशी वर्गणी करून पांधन रस्त्याचे मातीकाम करून चांगला रस्ता तयार करून मौलाचे योगदान केल्याबद्दल ग्रामस्थ शेतकर्यांनी अभिनंदन करून कौतुक करित आहे.