*पाटणसावंगी पोलिसांची दोन हॉटेल वर कार्रवाई*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेर – कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी घालून देण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाटणसावंगी कवडस परिसरात ड्राईव्ह अँड डाईन व एम एच 47 या हॉटेलवर मध्यरात्री पोलिसांनी कारवाही केली. या हॉटेलवर भा दं वि कलम १८८, २६९, २७० सहकलम ३७(१), (३), ३३ एम/१३१ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर असे की, पाटणसावंगी कवडस परिसरातील महामार्ग क्र ४७ वरील ड्राईव्ह अँड डाइन व एम एच 47 हे दोन्ही हॉटेल मध्यरात्री उशिरा पर्यंत कोरोना नियमाचे उल्लंघन करत सुरु राहत असल्याचे पाटणसावंगी चौकीतील पोलिसांना गुप्त माहिती च्या आधारे समजले.
पोलिसांनी त्या हॉटेल ची झडती घेतली असता. मा जिल्हाधिकारी साहेब नागपूर यांच्या कोविड 19 या साथीच्या रोगाच्या निर्मुलनाकरिता दिलेल्या आदेशाचे पालन न करता लोकांना साथ रोगाचा संसर्ग होईल या पध्द्तीने हॉटेल मध्ये चार टेबलवर १७ ग्राहक बसून जेवण देतांना दिसून आले. रोडवरून हॉटेलच्या आत काय चालले आहे हे न दिसण्यासाठी दर्शनीय भागावर भव्य काळा पडदा लावला होता, तसेच येणारे ग्राहक हे आपआपले वाहन दूर अंतरावर ठेवत होते त्यामुळे हे हॉटेल बंद असल्याचे बाहेरून दिसत होते.
या प्रकरणी पोलिसांनी हॉटेल मालक सिद्धार्थ सुनील अग्रवाल(३६) रा सदर नागपूर, यांच्या सह हॉटेल चे कर्मचारी रोहित चंद्रकांत सवाइतुल (३१) रा शिवाजी नगर कोराडी, अमित रामदास मडावी (२४) रा चिमूर जी चंद्रपूर, अजय मंगलसिंग राठोड (२९) रा तुरणवळणी जी यवतमाळ, करण लखनसिंग ठाकूर (२९) रा सिडियापलारी जी शिवणी (म प्र), राकेश वासुदेव बावणे (२५) रा चिमूर जी चंद्रपूर, अंकित संजय पातोडकर (२२) रा वलनी खदान ता सावनेर आदींवर गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर, संदीप नागरे, खोमेश्वर बांबल, हेमराज कोल्हे, हिम्मत राठोड, भुपेंद्र तभाने करीत आहे.