*खापा वन परिक्षेत्र परिसरात मादी बिबट व पिलाचा मृत्य*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेर ः तालुक्यातील खापा वन अधिकारी नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार साडेचार वर्षीय मादी बिबट व चार महिन्याच्या पिलाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी खापा वनपरिक्षेत्र विभागात उघडकीस आली.
*या दोघांचाही मृत्यू भुकेमुळे किंवा उष्माघाताने झाली असावी असा प्राथमिक अंदाज खापा वनपरिक्षेत्र अधिकार्यांनी व्यक्त केली आहे. एका प्रसिद्धी पत्रकात खापा वन परिक्षेत्र विभागाने सांगितले की, गुरुवारी 3 जूनला मोहगाव, पेंढरी, नाला बिट, कोथुळना, सहवन क्षेत्र खुबाळा येथे मादी बिबटचा मृत्यू झाल्याची सूचना प्राप्त झाली. त्यानुसार वन परिक्षेत्र कर्मचार्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांना साडेचार वर्षीय मादी बिबट व चार महिन्याचे पिल्लू मृतावस्थेत दिसले.*
*मु्त मादी बिबटचे शवविच्छेदन पशुधन विकास अधिकारी सावनेर डॉ. रोहिणी बावसकर, रेस्क्यू सेंटर नागपूरचे डॉ. बिलाल सय्यद तसेच मानव वन्यजीव रक्षक प्रतिनिधी आकाश कोहळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मृत बिबटचे संपूर्ण अवयव शाबूत असल्याने सदर बिबटाचा शिकार करण्यात हेतूने करण्यात आल्याचे स्पष्ट होत नसुन सदर दुर्दैवी घटना उष्माघात किंवा भुकेने या बिबट्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वन विभागाचे अधिकारी पी.एन.नाईक व्यक्त केली आहे.*
*मृत बिबटचे शव विच्छेदन करुण नमुने पुढील तपास कार्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असल्याची ही माहिती वन परिक्षेत्र अधिकारी पी. एन. नाईक यांनी दिली.तर नागपूर वन विभाग उप वनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा व सहायक वन संरक्षक एस. टी. काळे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे. यावेळी क्षेत्र सहायक एस. टी. कटरे, पी. आर. मडके, वन रक्षक डी. एस. गिते, के. के. सोनकुसळे, जी. बी. मुंडे, वन मजुर राजु मसराम व गणेश बोरीवार उपस्थित होते.*