*”नरखेड तालुक्यातील”वाढोणा” गावाचे पितळ उघडे*
*प्रसार माध्यमांना सांगितले एकही रुग्ण नाही*
*गावात १/५/२०२१ ला आला होता प्रिया बोडखे यांचा रिपोर्ट पॉझीटिव्ह*
नरखेड प्रतिनिधि – श्रीकांत मालधुरे
कार्यक्रमाला मोठ्या उत्साहात नेत्यांची हजेर
ग्रामपंचायतच्या माहिती बुकवर आहे फेब्रुवारी महिन्यापासून सात रुग्णनाची नोंद
नेत्यांना सत्कार करण्याची लगीनघाई झाली होती का? गावकऱ्यांचा प्रश्न?
नरखेड – तालुक्यातील”वाढोणा गावाचे पितळ उघडे कोविड महामारिने अख्या देशाला वेशिवर टांगले,नगर,शहर,गाव हैराण करून सोडले त्यातच काही शहरे आकडे लपवित आहेत तर काही गावे स्वताचीच पाठ थोपटृन घेत आहे असेच नरखेड तालुक्यातील एका वाढोना गावचे पितळ करामत उघडी पडली आहे,वाढोणा गावातील सरपंच उपसरपंच गावातील पदाधिकारी यांनी नेते मंडळींना माहिती दिली व सांगितले की वाढोना गाव हे कोरोनामुक्त झाले आहे उपस्थित होते,यावेळी पं.स. सदस्य सुभाष पाटील यांच्याहस्थे गावातील आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांचा सत्कार करण्यात आला.या गावातील सरपंच व तथाकथित नेते यांना सत्कार करण्याची लगणघाई झाली होती,याच गावात प्रिया किशोर बोडखे या महिलेचा कोविड-१९ या महामारिने ९ मे २०२१ या तारखेला दुख:द निधन झाले,जेमतेम २० ते २१ वर्षाची महिला तिने तिच्या पाठीमागे पती किशोर बोडखे एक छोटे निरागस बाळ सोडले आहे,या परिवाराला आर्थिक सहकार्याची गरज आहे;पण गावातील सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी या परिवाराकडे साफ दुर्लक्ष केले असून गावाचा सत्कार करून घेण्यातचं खुश होते शासनाने कोरोणा कोविड मुक्त गाव व त्या गावाला केलेली बक्षीस ची घोषणा त्याचा आपल्या गावाला फायदा झाला पाहिजे म्हणून काही नरखेड तालुक्यातील पदाधिकारी यांनी त्यागावात आशा वर्कर मदतनीस ग्रामपंचायत चपराशी यांचा सत्कार करून घेतला या गोष्टीचा काही वृत्तपत्रांत गाजावाज्या करून घेतला गावात येवढे कोरोणा कोविड रुग्न आढळून आले एका रुग्णाचा मृत्यू सुध्दा झाला तरी तरी नरखेड तालुक्यातील वाढोणा गाव कोरोणा मुक्त कसे असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला तरी शासनाने अश्या प्रतिनिधी वर कारवाई करावी अशी मागणी गावातील सुज्ञ नागरिकांनी केली आहे.
माझ्या पत्नी च्या मुत्यू मुळे माझ्या दोन महीने च्या मुलाला शासन कडून न्याय मिळावा व त्याचे उजवल भविष्य साठी आर्थिक मदत मिळावी
कीशोर बोडखे
(मुत्य महीलेचा पती)
सदर महिलेला कोरोणा कोविड ची लागन ही वरुड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे झाली असून तिला तेथूनच वर्धा येथे भरती करण्यात आले त्यामुळे गावाचा या पेशेन्ट सोबत काही संबंध नाही
चंद्रकला बनाईत
ग्रामपंचायत सरपंच वाढोणा