*ब्रेकींग न्यूज*
*शालेय बसने घेतला पेट*
*कोणतीही जीव हानी नाही*
*संपादक – किशोर ढुंढेले (सावनेर)
*सावनेर येथून तीन कीमी अंतरावर असलेल्या सारस्वत सेन्टर पब्लिक स्कूल ,आजनी च्या विद्यार्थ्यांना ने-आन करणारी टाटा मँजीक या स्कुल बस ने अचानक रस्त्यावर पेट घेतल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली सुदैवाने कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना न घडल्याने संस्था चालकांनी सुटकेचा श्वास घेतला*
*मीळालेल्या माहिती नुसार दररोज प्रमाणे केळवद परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना आनन्या करीता शाळेची टाटा मँजीक सावनेर.केळवद रोडवर जात असतांना मंगसा शिवारात सारस्वत पब्लिक स्कूल च्या टाटा मँजीक MH 40 AT _0114 च्या चालकास काही जळन्याचा गंध आल्यामुळे त्यानी गाडी रस्त्याच्या कडेला उभी करुण तपासणी करत असतांनाच उभ्या गाडीने एकच भडका घेत धु…धु जळु लागली बधता बधाता रस्त्याच्या दोन्हीही बाजूला बध्यांची व वाहनांची गर्दी होऊ लागली*
*सदर घटनेचे वेळी सदर बस विद्यार्थ्यांना घेण्यास जात असल्याने बस मधे कुनीही विद्यार्थी नसल्याने मोठी दुर्दैवी घटना होण्या पासुन बचावली सदर घटनेची माहिती शाळा प्रशासन व केळवद पोलीसांना तात्काळ देण्यात आली असुन पुढील तपास केळवद पोलीस करत आहे*
*बस मधे अचानक शार्ट सर्कीट मुळे आग लागल्याचे बोलल्या जात असुन पुढील तपासात ते निश्पन्नास येईलच परंतु अचानक लागलेल्या आगी मुळे आपल्या पाल्यांचा शालेय बस मधील प्रवास कीतपत सुरक्षीत आहे अशी चींता आता पालक वर्गाला सतावू लागली आहे.*