*रेल्वेच्या तिसऱ्या रुळामुळे स्टेशन रोड परिसरत उध्दभवणार्या सम्भाव्य धोक्यावर पावसाळ्यापुर्वी कृती करण्याची मागणी*
*कन्हान शहर काॅंग्रेस कमेटी चे नप मुख्याधिकार्यांना निवेदन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान – पिपरी नगरपरिषद अंतर्गत गेल्या काही दिवसान पासुन रेल्वेच्या तिसर्या लाईने चे काम सुरु असुन हळु हळु काम स्टेशन रोड परिसरत येत असल्यामुळे येथील उध्दभवणार्या सम्भाव्य धोक्यावर पावसाळ्यापुर्वी कृती करण्याची मागणी कन्हान शहर काॅंग्रेस कमेटी चे अध्यक्ष व नगरसेवक राजेश यादव यांच्या नेतृत्वात नप मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे यांना एक निवेदन देऊन करण्यात आली आहे .
कन्हान शहरात सुरु असलेल्या रेल्वेच्या तिसर्या रुळाच्या कामामुळे रेल्वे स्टेशन रोड परिसरातील नागरिकांना पावसाळ्यात मोठ्या संकटाशी सामना करण्याची क्षमता निर्माण झाली आहे . रेल्वे रुळा लगतच्या मोठ्या नाल्यात पावसाळ्यत सगळ्या नगरातुन वाहुन येणारे पाणी जमा होत असुन रेल्वे द्वारे या नाल्यावर भराव टाकुन बुजविण्यात येत असल्याने पावसाळ्यात संपुर्ण पानी वस्तीमध्ये जमा होऊन लोकांची घरे पाण्याखाली बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे . गवलीपुरा , गोंड मोहल्ला , एस.सी वस्ती , भागातील नागरिकांचा येण्या जाण्याचा मार्ग बंद केला जात असुन या ठिकाणी नगर परिषदेची पाईप लाईन व रस्ता देखील रेल्वे रुळाखाली जाणार असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागण्याची दाट शक्यता वाढली असुन पुर्ण वस्तीचा उतार याच भागात येत असल्यामुळे पुर्ण नगराचे पाणी याच वस्तीत तुंबल्यामुळे पावसाळ्यात पुर्ण वस्तीच बुडण्याचा धोका निर्माण झाल्याने कन्हान शहर काॅंग्रेस कमेटी चे अध्यक्ष व नगरसेवक राजेश यादव यांच्या नेतृत्वात नप मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे यांना भेटुन व या गंभीर विषया वर चर्चा करुन तसेच एक निवेदन देऊन तातडीने उपाय योजना करण्याची आवश्यकता भासली असुन रेल्वे प्रशासनाशी तातडीने चर्चा करुन नगरावर येणार्या भावी संकटावर तातडीने मार्ग काढण्याची युद्ध पातळी वर कृती करावी अशी मागणी केली आहे .
या प्रसंगी कन्हान शहर काॅंग्रेस कमेटी अध्यक्ष व नगरसेवक राजेश यादव , राजेंन्द्र शेंदरे , नगरसेविका कल्पना नितनवरे , पंकज गजभिए सह आदि नागरिक उपस्थित होते.