*कांन्द्री येथे क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची पुण्यतिथी साजरी*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कांन्द्री ग्रामपंचायत येथे क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथी निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करून क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार माल्यार्पण व पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करीत क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
बुधवार दिनांक.९ जुन २०२१ ला क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथी निमित्य कांन्द्री ग्रामपंचायत येथे सरपंच बलवंत पडोळे यांच्या हस्ते क्रांतीकारी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्प अर्पित करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी बिरसा मुंडा यांच्य जीवनावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपस्थित सर्व ग्राम पंचायत सदस्य , कर्मचारी यांनी क्रांतिकारी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली. याप्रसंगी सरपंच बलवंत पडोळे ग्राम पंचायत सदस्य धनराज कारेमोरे, राहुल टेकाम, गणेश सरोदे, राकेश मैथिया, मनोज मधुमटके , आनंद शमशेर, संदीप खेरे सह ग्राम पंचायत कर्मचा री उपस्थित होते.