*मानसुन पुर्व आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक*
*नैसर्गिक व मानव निर्मित आपदेला तोंड देण्यासबचाव पथक सज्ज – तहसीलदार सतीश मासाळ*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले
सावनेर – राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची मान्सुनपूर्व आपत्ती व्यवस्थापन एक दिवसीय प्रशिक्षण व मॉकड्रिल कार्यशाळा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नागपुर राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपुर यांच्या सौजन्याने दिनांक ११.०६.२०२१ रोजी नागपूर जिल्हायातील सावनेर तालुक्यात तहसील कार्यालय येथे मा . विभागीय आयुक्त नागपूर विभाग तसेच मा.जिल्हाधिकारी व समादेशक श्री पंकज डहाणे यांचे मार्गदर्शनामध्ये मान्सुनपूर्व आपत्ती व्यवस्थापन एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . सदर कार्यक्रमामध्ये सावनेर तालुक्यातील शोध व बचाव पथकाला जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती व मानव निर्मित आपत्ती या विषयावर गाव पातळीवर , तालुका पातळीवर , जिल्हा पातळीवर अचानक उदभवलेल्या आपत्तीचे निवारण करण्याकरिता स्थानिक संस्था व स्थानिक प्रशासन यांच्या संयुक्त उपक्रमाने आपत्ती व्यवस्थापना करिता लागणारे स्टैन्डर्ड डिवाईस व इम्प्रोवाईज डिवाईस चा वापरकरण्या चे प्रशिक्षण , नॉट चे प्रकार व नॉट बांधण्याचे प्रशिक्षण , C.P.R .. बोट चालविण्याचे व डॅम मध्ये पोहण्याचे प्रशिक्षण व प्रात्याक्षिक प्रशिक्षण देवुन संकटा थे वेळेस क्षमतेनुसार अत्यंत सहासाने व धैर्याने नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्ती निर्माण झाल्यास मदत कार्य करणे या बाबतचे व्याख्याने व्दारे , प्रात्याक्षिक व्दारे , आपत्ती व्यवस्थापनाचे विविध प्रकार वे उदा.सह आपत्ती व्यवस्थापनाचे जनजागृती ची एक दिवसीय कार्यशाळा आयोजीत करण्यात आली .
सदर प्रशिक्षणाकरिता आपत्ती विषयक प्रशिक्षणामध्ये पोलीस उपनिरीक्षक श्री एस एस जम्बेली यांनी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाबाबत माहीती दिली . तसेच नैसर्गिक व मानवी आपदा पासुन संरक्षण व व्यवस्थापन करणे , पुर आपत्ती पासुन पिडीतांना वाचविण्याचे विविधि प्रकार , त्यासाठी लागणारे विकसीत व पारंपारिक साधन , साहीत्याचे उपयोग करणे याबाबत ची माहीती दिली.
सदर कार्यशाळेकरिता सावनेर तालुक्यातील तहसीलदार श्री सतिश मासाळ , मंडळ अधिकारी श्री नांदुरकर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दिलीप ठाकुर , पंचायत समीती सदस्य श्री गोविंदराव ठाकरे , सरंपच श्रीमती चांदेकर , उपसरपंच श्री ढोके तसेच महसुल विभागाचे अधिकारी कर्मचारी , तलाठी , ग्रामपंचायत सदस्य , तालुक्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी , पट्टीचे पोहणारे हे प्रामुख्याने उपस्थित होते सदर कार्यशाळेकरिता राज्य प्रतिसाद दल नागपुर चे प्रशिक्षक वर्गामध्ये पोउपनि एस एस जम्बेली , पोउपनि एम एल मार्ला आर एल सोनकर , एन बी मुंढे , वाथ ही नखाते , एस.एस.देवकते , आर बी ठाकरे , व्ही एस खा , एस एम घाटोळे , एस एन वानखेडे यांनी आपत्ती व्यावस्थापनाबाबत प्रात्याक्षिकासह सखोल माहीती दिली.