*जिल्हाधिकाऱ्याने व आमदार यांनी घेतला मोवाड शहराचा आढावा*
नरखेड तालुका श्रीकांत मालधुरे
मोवाड – पावसाळ्याच्या सुरूवातीला मोवाड शहर व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार होणार नाही .१०० टक्के लसीकरण होईल यासाठी शुक्रवारी दि.११/६/२०२१ ला न.प.सभागृहात जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी घेतला.
मोवाड नगरपरिषदेला ठाकरे यांनी भेट दिली. या भेटी दरम्यान मान्सूनपूर्व तयारीची त्यांनी आढावा घेतला. सोबतच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी शेतकरी यांनी विशेष काळजी घेवीत .यासाठी शासनाची माहिती चित्रफीत जास्ती जास्त प्रसारीत करावीत. नगरपरिषदेच्या नियोजनाची माहीती घेतली. एक महिन्यात जिल्हाधिकारी यांनी दुसऱ्यांनदा आढावा घेतला. त्यामुळे शहरावर प्रशासनाचे पूर्ण लक्ष आहे.
आमदार अनिल देशमुख , यांनी पण पुढील कोरोना च्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी सुयोग्य नियोजन करुन शंभर टक्के प्रयत्न करावेत असे सांगितले यावेळी प्रमुख उपस्थित म्हणून नगरपरिषदेचे मुख्यधिकारी पल्लवी राऊत , उपविभागीय अधिकारी श्रीकांत उमरकर , तहसीलदार डी.जी. जाधव , खंडविकास अधिकारी मोहड , पोलिस निरीक्षक जयपालसिंग गिरासे , अतुल पंत जिल्हा सह आयुक्त ,निलीमा रेवतकर, वैभव दळवी पंचायत समीती नरखेड सदस्य,या बैठकीला उपस्थित होते. कोरोना प्रतिबंधासाठी सर्व नागरिकांचे लसिकरण आवश्यक करण्याचे निर्देश नगरपरिषद प्रशासनाला देण्यात आले.
नगरपलिका क्षेत्रातील दवाखाने , शहरात प्रक्टिस करणारे डॉक्टर तसेच सर्व सरकारी वैद्यकीय यंत्रणा कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व म्युकरमायकोसिस सारख्या आजारासाठी सज्ज असल्याचा आढावा नियमित घेण्याच्या सुचनाही दिल्या .
पंतप्रधान आवास योजनेचे निधी लवकरात लवकर उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना तातडीने कर्ज वाटप करण्यात येईल . लवकरच १८ वर्षावरील लसीकरणाला सुरूवात होईल . शहरात अंगणवाडीची संख्या वाढविण्यात यावी. असे जिल्हाधिकारी ठाकरे यांनी सांगितले.
या आढावा बैठकीला , माजी अध्यक्ष अनिल साठोने ,माजी अध्यक्ष सुरेश खसारे , शिवसेना शहर प्रमुख हिराचंद कडू , भाजप शहर अध्यक्ष रावी माळोदे , इस्माईल बारूदवाले , दिनेश पांडे , मंगेश नासरे , विनय वैद्य , विवेक लिखार , सोहेल शेख , लक्ष्मीनारायण निमकर प्रशासकिय अधीकारी नितीन तापकीर , वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रविण उमरगेकर , दिपा गवई , मनोज बिले , सहारे , केशव कळंबे , दत्ता चाटी ,अशिष बेले , वसंता सोनकुसळे , पत्रकार म्हणून ललित खंडेलवाल,श्रीकांत मालधूरे , अविनाश गजबे , अनिल ढोके उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कर निरक्षक धनराज मानकर यांनी केले.