*55 हजाराची लाच स्वीकखरतांना बडे बाबू व एका खाजगी इसमास अटक* *लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई ; अधिकारी कर्मचार्यात भरली धडकी*

*55 हजाराची लाच स्वीकखरतांना बडे बाबू व एका खाजगी इसमास अटक*


*लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई ; अधिकारी कर्मचार्यात भरली धडकी*

मुख्य संपादक – किशोर ढूंढेले

सावनेर – तहसिल कार्यालय सावनेर जि . नागपूर येथील महसुल सहाय्यक व खाजगी इसम यांचेवर अँन्टी करप्शन ब्युरोची कारवाई .*


*तहसिल कार्यालय सावनेर जि , नागपूर येथील महसुल सहाय्यक राजेन्द्र जिवन उबाळे , वय ५२ वर्षे व शुभम सुभाष साबळे , वय २३ वर्षे खाजगी इसम यानी ५५,००० / – रू लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना अन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहात पकडले*


*याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की , यातील तकारदार हे बाबा फरीद नगर , नागपूर येथील रहीवाशी असुन ते शेती करतात . तक्रारदाराचे वडील यांचे नावे मौजा कवडस तह . सावनेर जि . नागपूर येथे ०. ५६ हेक्टर शेती आहे , त्यापैकी ०१० हेक्टर शेत जमीन व्यवसायासाठी अकृषक करण्याकरिता तक्रारदार यांचे वडीलानी तहसिल कार्यालय सावनेर येथे रितसर अर्ज केला होता . सदर अर्जावर काय कारवाई करण्यात आली त्यासंबंधाने तक्रारदार हे महसुल सहाय्यक राजेन्द्र जिवन उबाळे याचे मदतनीस शुभम सुभाष साबळे खाजगी इसम यांना भेटले असता त्यांनी तक्रारदारास ०.१० हेक्टर शेतजमीन व्यवसायासाठी अकृषक करण्याकरिता ६०,००० / -रू लाचेची मागणी केली . तक्रारदार यांना महसुल सहाय्यक लिपीक राजेन्द्र जिवन उबाळे यांनी मागणी केलेली लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , नागपूर येथील कार्यालयात जावुन राजेंद्र जिवन उबाळे यांचे मदतनीस शुभम सुभाष साबळे खाजगी इसम यांचेविरुध्द तकार नोंदविली*


*लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , नागपूर येथील पोलीस उपअधिक्षक श्री संदिप जगताप यानी तकारदार यांनी दिलेल्या तकारीची अत्यंत गोपनिय रित्या शहानिशा करून सापळा कारवाईचे आयोजन केले . त्यामध्ये पडताळणी दरम्यान आरोपी महसुल सहाय्यक राजेन्द्र जिवन उबाळे यांचे मदतनीस शुभम सुभाष साबळे खाजगी इसम यांनी तक्रारदार यांचे वडीलांचे ०.१० हेक्टर शेत जमीन व्यवसायासाठी अकृषक करण्याकरिता ६०००० / -रू लाचेची मागणी करून तडजोडअती ५५,००० / -रू आरोपी क्र . २ शुभम सुभाष साबळे , खाजगी इसम याचेहस्ते पंचासमक्ष लाच रक्कम आज दि . १४/६/२०२१ रोजी तहसिल कार्यालय सावनेर येथे स्विकारल्याने त्यांना अँन्टी करप्शन ब्युरोच्या नागपूर पथकाने रंगेहात पकडले .*


*त्यावरून दोन्ही आरोपी विरूध्द पोलीस स्टेशन सावनेर , जि . नागपूर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात येत आहे . सदरची कामगिरी श्रीमती रश्मि नांदेडकर , पोलीस अधीक्षक , लाप्रवि नागपूर परिक्षेत्र , अपर पोलीस अधीक्षक श्री . मिलींद तोतरे याचे मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक श्री संदिप जगताप , लाप्रवि , नागपूर , पोहवा प्रविण पडोळे , नापोशि मगेश कळवे , पकज घोडके , अनिल बहीरे , पोशि हरिष गाजरे , मपोशि दिपाली भगत , चालक सदानंद सिरसाट सर्व ला.प्र.वि. नागपूर यांनी केली .*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …