*मंत्री केदार यांच्या आढावा बैठकीत भाजप आमदारांचा राडा*
*माजी जिल्हापरिषद अध्यक्ष सुरेश भोयर व आमदार टेकचंद सावरकर यांच्यात तू तू मै मै*
*आढावा बैठकीत घडलेल्या प्रकारावर पशुसंवर्धन,दुग्धविकास,क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदारांन यांनी केली खंत व्यक्त*
मुख्य संपादक – किशोर ढूंढेले सोबत प्रतिनिधि ऋषभ बावनकर
कामठी: मार्च 2021 पासून आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्व काही विस्खळीत होऊन विकासाची गती मंदावली अश्यात आता कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून रखडलेल्या विकासकामांना गती मिळावी व ते, लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेत त्यांच्या समस्या सोडविणे या मुख्य उद्देशाने राज्याचे पशुसंवर्धन,दुग्धविकास,क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली आज 14 जून ला सकाळी 10 वाजता कामठी तालुका आढावा सभा आयोजित होती.
सदर आढावा सभेत अधिकाऱ्यांवर आरोप प्रत्यारोपण करण्या ऐवजी नागरिकांच्या समस्येला न्याय मीळवू देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याकडून नागरिकांच्या समस्येचे समाधान केव्हा व कसज होईल यावर भर देण्यात आला.तसेच कामठी शहर ख्यातनाम व उदयमान फुटबॉल खेळाडूमुळे करीता ओळखले जाते तेव्हा शहरात लवकरच दर्जेदार फुटबॉल स्टेडियम उभारने गरजेचे असल्याचे मनोगत क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी तालुकास्तरीय आढावा बैठकीत व्यक्त केले.
*याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मीताई बर्वे, माजी जी प सदस्य प्रा अवंतीकाताई लेकुरवाडे, जी प सदस्य तापेश्वर वैद्य, माजी जी प अध्यक्ष सुरेशभाऊ भोयर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हुकूमचंद आमधरे, जी प चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, एसडीओ श्याम मदनूरकर, तहसिलदार अरविंद हिंगे यासह विविध शासकीय विभागातील अधिकारी वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते.*
*दरम्यान या आढावा सभेला कामठी मौदा विधानसभेचे आमदार टेकचंद सावरकर हे उशिरा उपस्थित झाल्याने त्यांना व्यासपीठावरील पहिल्या रांगेतील शेवटच्या आसन बैठकीवर आसन ग्रहण करावे यावेळी तहसीलदार अरविंद हिंगे यांनी आमदार सावरकर यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायला गेले असता या स्वागताचा अस्वीकार करीत शेवटच्या बाकावर आसन ग्रहण करण्यात आल्याचा नाराजगीचा सूर वाहला व कार्यक्रमातून बाहेर पडत कार्यक्रमाचा निषेध नोंदवीत असता उपस्थित कांग्रेसचे वरिष्ठ कार्यकर्ते व माजी जिल्हापरिषद अध्यक्ष सुरेश भोयर व आमदार सावरकर यांच्यात झालेल्या शाब्दिक वादाने ही आढावा बैठक तापू लागली आढावा बैठकीत रंगलेल्या तु- तु,मै- मै मधे मंत्री सुनील केदार यांनी मिटवण्यासाठी प्रयत्न करत दोघांना शांत करण्याची भुमिका घेतली परंतू भाजप आमदार सावरकर यांनी आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनविल्याने सदर आढावा बैठकीत राजकीय अखाडा रंगल्याचे एकच चित्र निर्माण झाले.*
*तालुकास्तरीय या आढावा बैठकीत एकूण 17 विषयावर आढावा घेण्यात आला.ज्यामध्ये कामठी तालुक्यातील पाणी टंचाई अंतर्गत मंजूर कामाचा आढावा,कोविड 19 च्या अनुषंगाने 18 वर्षावरील मुलांच्या उपचार व लसीकरणाकरिता केलेल्या उपाययोजना,गोरगरीब गरजुंना घरे, महाराष्ट्र राज्य वीज वितरण विभागाकडील वीज जोडनीची मागणी व जोडनी, खरीप हंगाम 2021 करिता बी बियाणे व खतांची उपलब्धता,घरकुल बांधकाम आढावा, रुलर व अर्बन योजनेचा आढावा, पीक कर्ज वाटपाचा आढावा, पीक विमा योजनेचा आढावा,मागील दोन वर्षात मंजूर झालेल्या स्थानिक जल संधारणचे कामाचा आढावा, कालवा दुरुस्तीचा आढावा, नदी काठच्या गावांचा आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा,जिल्हा परिषद कडील मंजूर संपूर्ण कामाचा आढावा,भूमी अभिलेख विभागाकडील मोजणी प्रकरणाचा आढावा आदींचा समावेश होता.*
*सदर आढावा बैठक ही राजकीय सभा नसून विकासाला गती देण्यासाठी म्हणून ह्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात होते.नागरिकांच्या समस्येचे निराकरण होत नसून समस्येचे प्रकरण प्रलंबीत असल्याने या समस्येचे निराकरण करण्यासाठी अधिकारी व शासन समोरासमोर येतात व नागरिकांच्या समस्येचे निराकरण करून देणे हे येथील लोकप्रतिनिधींचे पहीले कर्तव्य आहे हे नाकारता येत नाही.मात्र काही लोकप्रतीनिधी स्वतःच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण करून तसेच राज्य शासनाच्या पारदर्शक कार्यप्रणालीमुळे भयभीत झाले असुन त्यांना त्यांच्या पायाखाली विकास राज्य शासन करत असलेल्या लोकाभिमुख विकास कार्याचे हादरे बसू लागले आहेत व ते आपली जमीन वाचवण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाऊ शकतात आजच्या आढावा बैठकीला ही विरोधी पक्षाच्या आमदारांने राजकीय अखाडा बनू इच्छित आहे अशी खंत मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केली.*
*तर भाजप चे आमदार टेकचंद सावरकर यांनी सदर विषयावर मत व्यक्त करत म्हटले की मी या क्षेत्राचा आमदार आहे.सदर आढावा बैठकीत मला अपमानास्पद वागणूक तर मीळालीच परंतु जेव्हा मी विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला तर मला अजिबात बोलू दिले नाही.जेव्हा एक आमदाराला मंत्री मोहदया पुढे बोलू दील्या जात नाही तर जनसामान्यांची काय होणार असे मत व्यक्त करीत मंत्री सुनील केदार व आढावा बैठकीचा निषेध तीव्र शब्दात नोंदवला*
*काँग्रेसचे वरिष्ठ कार्यकर्ते व जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांनी घडलेला प्रकार हा दुर्दैवी असुन जनप्रतिनींधींची प्रतीमा मलीन करणारा आहे.सुचारू रूपाने सुरू असलेल्या आढावा बैठकीला आमदार सावरकर यांनी हेतुपुरस्सर सदर विघ्न आणत आपल्या अकार्यक्षमतेची ओळख करूण देण्याचा प्रयत्नात ते जनप्रतिनीधी आहेत यांचाही त्यांना विसर पडला आहे.व ते महाविकास आघाडी सरकारचे विकार पुर्ण धोरण तसेच नागपुर जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेषतः कामठी तालुक्यातील विकास कामामुळे त्यांना धास्ती बसली आहे व त्यामुळे त्यांनी मंत्री महोदयांच्या सदर कार्यक्रमात केलेला हा गैरप्रकार पुर्व नियोजित होता असा खनखनीत आरोप आमदार सावरकर यांच्यावर केला*