*आर्वी शहरात बुधवारी झालेल्या पावसामुळे शहराच्या प्रभागातील आणि वॉर्डातील रस्ते चिखलमय*
वर्धा प्रतिनिधि – पंकज रोकड़े
आर्वी – नागरिकांना मार्गक्रमन करणे सुद्धा दुरापास्त झाले असून अनेक चारचाकी दुचाकी चिखलात फसत आहेत. काहींचे या मुळे अपघातही होत आहे. अनेक भागात भूमिगतचे खोदकाम सुरू असल्याने चांगले सिमेंट व डांबरी रस्ते फोडून माती सर्वत्र रस्त्यावर आली आहे. मात्र यंत्रणेने रस्ते पूर्ववत न केल्याने सर्वत्र चिखल व खड्डे तयार झाले आहे.
पांडुरंग वार्ड, आसोले नगर, जिजाऊ नगर, देऊळकर लेआऊट, शाहू महाराज लेआऊट, तायडे लेआऊट, वसंत नगर, राधाकृष्ण नगर, जाजूवाडी अगस्ती इथल्या नागरिकाचे बेहाल होत आहे.
संभाजी ब्रिगेड च्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत आज प्राधिकरण विभागाशी संपर्क केला तसच कंत्राटदाराचा चालढकलपणा स्थानिक लोकांना होणारा त्रास व परिस्थिती ऑफिसर डहाके यांना लक्षात आणून संबंधित वॉर्डात घेऊन जाऊन पाहणी करून घेतली.
येत्या दोन दिवसामध्ये रस्त्यावरचा चिखल साफ़ करा अन्यथा आमच्या भावनांचा बांध फुटून आक्रमक वळन घेतल्या जाईल असा इशारा तिथे निवेदनातून देण्यात आला. यावेळी
अध्यक्ष रोहन हिवाळे. संघटक गणेशजी चाफ़ले, मीडिया प्रमुख सारंग वाघमारे, शाखा प्रमुख निखिल लंगडे, आकाश सौदागर, आशिष डाहे, शुभम राजे व वॉर्डातील कार्यकर्ते उपस्थित होते.