*औ.वि.केंद्र खापरखेडा येथे महाराणा प्रताप यांची जयंती साजरी*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी- दिलीप येवले
खापरखेडा:- रविवार, दिनांक 13/06/2021 रोजी सकाळी 10:30 वाजता प्रशासकीय इमारत येथील सौदामिनी सभागृह येथे महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष खापरखेडा औष्णिक विघुत केंद्राचे मुख्य अभियंता राजू घुगे होते.
याप्रसंगी राजू घुगे, मुख्य अभियंता यांच्या शुभहस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विधिवत पूजन करण्यात आले तसेच घुगे यांनी महाराणा प्रताप यांचा जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. याप्रसंगी अनिल कठोये, उप मुख्य अभियंता (प्रशासन), अमरजीत गोडबोले, कल्याण अधिकारी(प्र.), यांसमवेत अधिकारी, अभियंते व कर्मचारी आदि उपस्थित होते.