*नाल्यात बुडून बहीण-भावाचा मृत्यू*
*हिंगणा तालुक्यातील सावंगी देवळी येथील धक्कादायक घटना*
विशेष प्रतिनिधी –
हिंगणा – तालुक्यातील सावंगी देवळी या गावात एक धक्कादायक प्रकार घडल्याचे दिसून आले.एकाच घरचे सगे बहीण-भाऊ एका लहानशा नाल्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी लक्षात आली.देवळी येथील रहिवासी श्री.नामदेव राऊत यांची मुलगी कुमारी.आरुषी नामदेव राऊत(वय 10 वर्ष) व मुलगा कु.अभिषेक नामदेव राऊत (वय 7 वर्ष) हे दोन्ही बहीण भाऊ काल दुपारी 3 वाजताच्या सुमारास घराबाहेर खेळण्यास गेले असता रात्री घरी न आल्याने त्यांची शोधाशोध सुरू झाली.
प्राप्त माहितीनुसार मृतकांची आई ही शेतात कामावर गेली असतांना मुले हे घरीच खेडत होती.दुपारच्या सुमारास ही मुले नाल्याच्या दिशेने निघाले,व स्वतःच्या अंगावरचे कपडे काढून पोहण्यासाठी नाल्यात उतरले.त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते खूप खोल पाण्यात गेले.व अशातच त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाले.मुलांची आई जेव्हा घरी आली आणि आपले मुलं कुठंच दिसत नाही हे लक्षात येताच मुलांचे शोध घेण्यास गावकऱ्यांनी सुरुवात केली.जवळपास ही शोधाशोध रात्री 2 वाजेपर्यंत चालली.परंतु त्यांची कोणतीही माहिती भेटली नाही.मग सकाळी पुन्हा शोध घेत असताना त्याच ठिकाणी जाऊन पाहिलं असता दोन्ही मुलांचे कपडे व चप्पल नाल्याच्या काठावर असल्याचे दिसून आले.त्याअगोदर पोलीस स्टेशन हिंगणा येथे तक्रार करण्यात आली होती.अशातच मुलांचा शोध लागल्यानंतर तात्काळ पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली.पोलिसांनी येऊन मुलांचे मृतदेह बाहेर काढून त्यांचं PM करून शरीर नातेवाईकांकडे सोपविण्यात आले.