*कन्हान परिसरात पाऊसाची तीन दिवस चांगली हजेरी , नदी ही दुथडी भरून वाहु लागली* *पेच धरणाचे दोन गेट उघडले , नदी काठाच्या नागरिकांना सर्तकते चे निर्देश दिले*

*कन्हान परिसरात पाऊसाची तीन दिवस चांगली हजेरी , नदी ही दुथडी भरून वाहु लागली*

*पेच धरणाचे दोन गेट उघडले , नदी काठाच्या नागरिकांना सर्तकते चे निर्देश दिले*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान शहर व परिसरात गुरुवारी जोरदार पावसाचे आगमन झाल्याने नागरिकांना गर्मी पासुन थोडी मुक्ती मिळुन वातावरण आंनदी आणि प्रफुलित झाले. या अगोदर काही दिवसा पासुन थांबु थांबुन अंतराने थोडा फार पाऊस येत होता. कन्हान परिसरात गुरवार ला सका़ळ पासुनच आकाश ढगाळ असुन रिमझिम पाऊस सुरू झाला. त्यानंतर दुपारी काळेभोर आकाश ढगाने व्यापल्याने एक दिड जोरदार पाऊस पडुन शहरात जागो जागी पानी साचले होते. गुरवारी सुरू झालेला पाऊस शुक्रवार व शनिवार ला सुध्दा येत होता. शहरात तीन दिवस सतत झालेल्या पावसाने वातावरण थंड हो़ऊन लोकांना गर्मी पासुन थोडी मुक्तता मिळुन परिसर आंनदी व प्रफुल्लीत झाला. परंतु शहरतील मुख्य मार्ग व रस्त्यावर पाऊसाचे पाणी साचुन नागरिकांना भयंकर त्रास सहन करावा लागला. यास्तव नगर प्रशासना ने आता तरी शहरातील मुख्य नाले, नालीची साफ सफाई व्यवस्थीत करून घ्यावी अन्यथा येणार्या जोरदार पाऊसाचे पाणी व्यवस्थीत निकासी न झाल्यास लोकांच्या घरात शिरून नागरिकांना भयंकर त्रास सहन करून नुकसानीला सामोर जावे लागेल .

*पेच धरणाचे दोन गेट उघडले, कन्हान नदी दुथडी भरून जलस्तर वाढला.*

मध्यप्रदेशात पाऊसाचे चांगले आगमन झाल्याने चौराई धरण भरल्याने धरणाचे गेट उघडुन त्यातील पाण्याचा विसर्ग करित असल्याने पाणी तोहलातोड व पेच धरणात येत पेच धरणात ९१% च्या वर पाणीसाठा होत असल्याने शुक्रवार (दि.११) ला सकाळी १० वाजता पासुन पेंच धरणाचे २ दरवाजे (गेट) ३० सेमी ने उघडुन धरणातील ०.२२८ (क्युमेक) पाण्याचा विसर्ग संबधित अधिकार्यांच्या उपस़्थित पेंच नदी द्वारे कन्हान नदीत सोडण्यात आल्याने कन्हान नदी दुथडी भरून वाहुन नदीचा जलस्तर वाढला आहे. यास्तव उपविभागीय अभियंता, पेंच पाटबंधारे उपविभाग पारशिवनी यांनी उपविभागीय अधिकारी रामटेक द्वारे तहसिलदार पारशिवनी यांच्या मार्फत तालुक्यातील पेंच व कन्हान नदी काठावरील नागरिकांनी नदी पात्रात जावु नये व सतर्क राहावे तसेत जंगम मालमत्ता गुरे, ढोरे व ईतर नुकसान हो़ईल नाही यांची दक्षता व काळजी घेण्याचा ईशारा स्थानिक प्रशासना द्वारे दवंडी आणि इतर सुविधाने देण्यात आला होता.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …