*मनसे चौक ते डांगरी वार्ड पुलापर्यंत रोडचे रुंदीकरण, दोन महिण्यात पुर्ण करा, अन्यथा रोड वर आंदोलन करु*
*आप पार्टी नेता, प्रफुल क्षिरसागर यांचे प्रशासनाला चेतावनी*
*प्रफुल्ल क्षिरसागर यांच्या नेतृत्वात ३००लोकांच्या स्वाक्षरीसह नगरपालिका प्रशासन यांना जनतेच्या मांगणीचे निवेदन सादर*
हिंगणघाट प्रतिनीधी – भाऊराव कोटकर
हिंगणघाट – मनसे चौक ते डांगरी वार्ड पुलापर्यंत चा रस्ता फारच खराब झाला. शहरातील मुख्य रस्त्यापैकी हा सुध्दा एक रस्ता असुन दररोज हजारो लोक ,मुली,महीला त्या रस्त्यावरुन जाणेयेणे करते. परन्तु प्रशासनाने गटर योजना,अम्रुत योजने करिता रस्त्याचे खोदकाम केले,परंतु नगरपालिका प्रशासनाने आणि जवाबदार व्यक्तीने कसलीही जवाबदारी न घेतल्यामुळे रस्त्यामध्ये गड्डा की, गड्या मध्ये रस्ता आहे?हेच कळत नाही. अश्यातच पावसाळा सुरु,यातपुन्हा ‘आगीवर तेल ‘ ह्या मण्ही प्रमाणे रस्त्यावर लोकांना जाण्यायेण्याचा त्रास होत आहे,यात एकादा अपघात घडल्यास, याला जवाबदार कोण? असा प्रश्न अभिषेक आंबटकर यांनी उपस्थित केला.
तसेच या रस्त्याजवळ आठवडी बाजार,दररोजची भाजीमंडी येथे भरण्यात येते.
त्या करिता या रस्त्याचे रुंदीकरण्याच्या मांगणी सोबतच
१)या रस्त्याला मुख्यरस्त्याचा दर्जा देवुन रुंदीकरण करण्यात यावे.
२)रस्त्याच्या दोन्ही बाजुला गट्टु लावण्यात यावे.
३)रस्त्याच्या दोन्ही बाजुच्या नाल्यांचे रुंदीकरण करण्यात यावे.
४)रस्त्याच्या मध्यभागी स्ट्रीट लाईट देण्यात यावे.
५)डांगरी वार्ड च्या पुला जवळ सीसीवी क्यामेरा लावण्यात यावे.
गेल्या ५ वर्ष्यात शासनाच्या योजना करिता रस्ता फोडण्यात आला,परंतु अजुन पर्यंत शासनाने कां बनविला नाही? असाही प्रश्न मनोज कोटकर आणि वार्डातील नागरीकांनी उपस्थित केला.
वार्डातील समाजसेवक श्री प्रफुल क्षिरसागर यांनी पुढाकार घेऊन वार्डातील नवयुवका सोबत नगरपालिका मुख्याधिकारी,यांना निवेदन देऊन मुख्य रस्त्याची व रुंदीकरनाची मागणी केली.
जर हा रस्ता दोन महिण्यात रुंदीकरण न झाल्यास वार्डातील
पुरुष,महिलासह रस्त्यावर आंदोलन करु असा ईशाराही निवेदना द्वारे नगरपालिका प्रशासनाला देण्यात आला.
निवेदन देताना वार्डातील, अभिषेक आंबटकर, प्रशांत विरुळकर, उमेश कुठेमाटे,नितीन विरुळकर, मनोज कोटकर, किशोर जुमडे,शुभम विरुळकर व नागरिक उपस्थित होते.