*जाम प्रकल्प येथे राज्य आपत्ती दलाची मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न*
काटोल प्रतिनिधि – दुर्गाप्रसाद पांडे
काटोल – आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नागपूर तथा राज्य आपत्ती प्रतिसाद दल नागपूर यांच्या सौजण्याने 15 जून रोजी रिधोरा तालुका काटोल येथील जाम प्रकल्पावर विभागीय आयुक्त , जिल्हाधिकारी व समादेशक पंकज दहाने तसेच सहाय्यक समादेशक सुरेश कराळे यांच्या मार्गदर्शनामध्ये मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमामध्ये काटोल नरखेड तालुक्यातील शोध व बचाव पथकाला जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती व मानव निर्मित आपत्ती या विषयावर गाव पातळीवर, तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर अचानक उध्दभवलेल्या आपत्तीचे निवारण करण्याकरिता स्थानिक संस्था व व स्थानीक प्रशासन यांच्या संयुक्त उपक्रमाने आपत्ती व्यवस्थासपणाकरिता लागणारे स्टॅंडर्ड डिव्हाईज व इम्प्रोवाईज डिव्हाईज चा वापर करण्याचे प्रशिक्षण, नॉट चे प्रकार व नॉट बांधकासमाचे प्रशिक्षण, अचानक एखाद्या व्यक्तीला हृदयघात झाल्यास सीपीआर देऊन वाचविणे, बोट चालविण्याचे व ड्याम मध्ये पोहण्याचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक प्रशिक्षण देऊन संकटाचे वेळेस क्षमतेनुसार अत्यंत साहसाने नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्ती निर्माण झाल्यास मदत कार्य करणे या बाबतचे व्याख्यानाद्वारे तसेच प्रात्यक्षिकद्वारे आपत्ती व्यवस्थापनाचे विविध प्रकारचे उदाहरणांसह आपत्ती व्यवस्थापणाचे जनजागृतीची एकदिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
सदर प्रशिक्षणाकरिता आपत्ती विषयक प्रशिक्षणामध्ये वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक आर एन मडावी व पोलीस उपनिरीक्षक एस जंबेली यांनी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाबाबद माहिती दिली तसेच नैसर्गिक व मानवी आपदा पासून संरक्षण व व्यवस्थापन करणे पूर आपत्ती पासून पीडितांना वाचविण्याचे विविध प्रकार त्यासाठी लागणारे विकसित व पारंपारिक साधन साहित्याचे उपयोग करणे याबाबदची माहिती दिली.
सदर कार्यशाळेकरिता काटोल चे उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, काटोलचे तहसीलदार अजय चरडे तसेच नरखेड येथील तहसीलदार जाधव, नायब तहसीलदार निलेश कदम, श्री जवंजाळ व गट विकास अधिकारी, मंडळ अधिकारी , तलाठी , ग्रामसेवक , रिधोरा सर्कलचे संजय डांगोरे प.स सदस्य, रिधोरा सरपंच नलिनी राऊत, सदस्य वैभव राऊत , पोलीस पाटील सुषमा मुसळे , सरपंच कचारीसावंगा रवी जैस्वाल, समाजसेवक प्रशांत पवार,काटोल नगरपरिषदेचेफायर ब्रिगेडचे कर्मचारी, पोलीस स्टेशन काटोल येथील पोलीस व होमगार्ड काटोल तहसील कार्यालयातील कर्मचारी तसेच तालुक्यातील सभोवतालच्या गावातील लोकप्रतिनिधी व पोलीस पाटील उपस्थित होते व यांच्या उपस्थितीत आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलीस उपनिरीक्षक आर मडावी, पोलीस उपनिरीक्षक जंबेली तसेच प्रशिक्षक वर्गामध्ये आर सोनकर, एन मुंढे, वाय नखाते,एस देवकते, आर ठाकरे, व्ही खारडे, एस घाटोळ, एस वानखेडे यांनी आपत्ती व्यवस्थापणा बाबद प्रात्यक्षिकासह सखोल माहिती दिली.