*पावसाळा सुरू झाल्याने आरोग्य केंद्रात अँन्टी स्नेक वेनो इंजेक्शन उपलब्ध ठेवण्याची मागणी* *सुत्तम मस्के यांचे प्राथमिक आरोग्य केंन्द्र वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश चौधरी यांना निवेदन*

*पावसाळा सुरू झाल्याने आरोग्य केंद्रात अँन्टी स्नेक वेनो इंजेक्शन उपलब्ध ठेवण्याची मागणी*

 

*सुत्तम मस्के यांचे प्राथमिक आरोग्य केंन्द्र वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश चौधरी यांना निवेदन*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष नागपुर जिल्हा ग्रामिण प्रमुख श्री सुत्तम मस्के यांनी प्राथमिक आरोग्य केंन्द्र वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश चौधरी यांना निवेदन देऊन प्राथमिक आरोग्य केंन्द्रात अँन्टी स्नेक वेनो इंजेक्शन उपलब्ध ठेवण्याची मागणी केली आहे.

कन्हान व आजु-बाजुच्या परिसरातील मोठ्या प्रमाणात शेती होत असुन या ३० गावाकरिता आरोग्य सेवा देणारे प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान शासकीय एकमेव दवाखाना असल्याने सध्या पावसाळा सुरू होऊन जमिनीत व शेतीमध्ये पाणी जमा होऊन जमिनीखाली व बिळात असणारे सरपटणारे प्राणी मोठ्या प्रमाणावर बाहेर निघत अचानक शेतकऱ्यांना चावा घेत असतात. साप,विंचु चावलेल्या रूग्णांना वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने नागरिकांचा बळी जातो. यास्तव प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथे अँन्टी स्नेक वेनो इंजेक्शन उपलब्ध करून ठेवण्यात यावे . अशी मागणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष नागपुर जिल्हा ग्रामिण प्रमु़ख श्री सुत्तम मस्के यांनी प्राथमिक आरोग्य केंन्द्र वैद्यकीय अधिकारी डॉ योगेश चौधरी यांना निवेदन देऊन केली आहे .

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …