*वैद्यकीय एमबीबीएस अभ्यासक्रमात अँडमिशन करण्यावरून पिपरीच्या पालकांची केली फसवणुक*
*हरिष तिवाडे ची चार आरोपींनी ११,०९,२०० रू. नी फसवणुक केल्याने गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत दुर्गा मंदीर पिपरी येथील हरिष तिवाडे यांची चार आरोपींनी संगमत करून त्याच्या मुलीचे सरकारी कोटयातुन वैद्यकीय एमबीबीएस अभ्यास क्रमात अँडमिशन करण्याकरिता ११,०९,२०० रूपये घेऊन अँडमिशन न करता फसवणुक केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांच्या तक्रारीवरून चारही आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
कन्हान – पिपरी दुर्गा मंदिर चौक प्रभाग क्रमांक.६ येथील श्री हरिष मोतीराम तिवाडे वय ५२ वर्ष यांच्या मुलीचे सरकारी कोटयातुन वैद्यकीय एमबीबीएस अभ्यासक्रमात अँडमिशन करण्याकरिता दिनांक.११ डिसेंबर २०२० चे ११:०० वाजता ते दिनांक.१५ फेब्रुवारी २०२१ चे ६:०० वाजता च्या दरम्यान आरोपी १) डॉ राकेश वर्मा राहणार. लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज सायन मुंबई, २) शेखर राय उर्फ चंन्द्रशेखर आत्राम राहणार. सेमीनरी हिल्स नागपुर, ३) राजेश गुहा राहणार. सेक्टर २० खारघर नवी मुंबई, ४) डॉ. राकेश वर्मा यांचा चपरासी राहणार.लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज सायन मुंबई यांनी संगणमत करून फिर्यादी हरिष तिवाडे यांचा विश्वास संपादन करून फिर्यादी यांची मुलगी हिचा सरकारी कोट्यातुन वैद्यकीय एम.बी.बी.एस अभ्यासक्रमासाठी अँडमिशन करून देतो असे खोटे सांगुन फसवणुक करण्याचा उद्देशाने फिर्यादी कडुन वेळोवेळी अँडमिशन करिता ११,०९,२०० (अकरा लाख नऊ हजार दोनसे रुपये) घेऊन फसवणुक केल्याचे लक्षात येताच फिर्यादी हरिष तिवाडे यांनी कन्हान पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केल्याने कन्हान पोलीसांनी सदर प्रकरणाचा तपास करित चारही आरोपी विरुद्ध कलम ४२०, ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करून आरोपीचा शोध घेणे सुरु आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्ष क अरूण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक जावेद शेख हे करीत आहे.