*आर्वी येथील बालाजी नगर प्रभागात प्राधिकरणाच्या नळाची पाणी टंचाई*
वर्धा प्रतिनिधि – पंकज रोकड़े
आर्वी – येथील बालाजी नगर येथे व काही प्रभागात प्राधिकरणाच्या पाण्याची टंचाई होत असल्यामुले व पाणी घेताना मुबलक प्रमाणात नळाद्वारे येत नसून अपुऱ्या पाण्याचा
होणारा त्रास येथील स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे. म्हणून आज दिनांक 18 जूनला संभाजी ब्रिगेड महिला आघाडी तर्फे जीवन प्राधिकरण विभाग आर्वी येथे निवेदन देण्यात आले.
प्राधिकरण लाइन ज्या लोकांनी घेतली आहे त्या सर्वांनी महिन्याचे बिल भरले असून सुद्धा त्यांना टंचाई का भासत आहे असा प्रश्न यावेळी तालुकाध्यक्ष अर्चनाताई चापले यांनी उपस्थित केला.
विभागाने लवकरात लवकर
दखल घेऊन उपाययोजना करावी अन्यथा संभाजी ब्रिगेड महिला आघाडी आपल्या कार्यालयावर धडक मोर्चा घेऊन आल्या शिवाय राहणार नाही. असे निवेदनातून सांगण्यात आले असून यावेळी तालुकाध्यक्ष अर्चना ताई चापले, ज्योती ताई जाधव, सविता ताई चतुरकर, पूनम ताई मैदानकार, प्रियांका ताई गुजर, स्मिता ताई महाजन, ह्या उपस्थित होत्या.