*युवतीवर अतिप्रसंग ; आरोपी फरार*
विशेष प्रतिनिधि
सावनेर- पोलिस स्टेशन 26 वर्षीय पिडीत फिर्यादी हिला आरोपी नामे- अतुल मधुकर काकडे , वय 26 वर्ष , रा . चांपा ता . कळमेश्वर जि . नागपूर फिर्यादी हिला पाटणसावंगी ता . सावनेर येथील बाजार चौकात बोलावुन प्रपोज करून तिच्याशी प्रेम सबंध करून लग्नाचा आमीष दाखवुन वेळोवेळी मानकापुर नागपुर व चांपा ता . कळमेश्वर गावा जवळील फार्म हाउस वर लैंगीक अत्याचार करून गर्भवती केले . फिर्यादीची ईच्छा नसतांनाही तिला गर्भपाताच्या गोळया देवुन गर्भस्त्राव केला आहे . सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरुन पो.स्टे . सावनेर येथे आरोपीविरुध्द कलम 376 ( 1 ) , 312 भादंवि . कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे . आरोपीचा शोध घेणे सुरू असून गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मारुती मुळक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक श्री . निशांत फुलेकर मो न . 7588564300 हे करीत आहे .*