*महामार्गाच्या चारपदरी रस्ता व सर्व्हिस रस्त्या मधिल उघडा पुल अपघातास निमत्रंण*
*या उघडया पुलात वाहने पडुन कित्येक अपघात झाले*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – नागपुर जबलपुर राष्ट्रीय चारपदरी रस्ता व सर्व्हिस रस्ता मधिल नाल्याचे पुल उघडे व रस्ता बरोबर असुन सर्व्हिस रस्त्याने ये-जा करणार्या दुचाकी, चारचाकी वाहन चालकांना व्यवस्थित दिसत नसल्याने वाहन या पुलातील खडयात पडुन होणार्या अपघातात वाहन चालक गंभीर जख्मी होत आहे.
नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग क्र ४४ च्या टेकाडी बस स्टाप पासुन ते मनसर पर्यंत चारपदरी रस्त्या लगत स्थानिय जवळपास वळण घेणास वाहना करिता सर्व्हीस रस्ता असणे आवश्यक आहे. परंतु हा चारपदरी रस्ता तयार करतांना फक्त जास्त वर्दळ असणार्या काही काही अंतरावर रस्त्या लगत सर्व्हीस रस्ता तयार करण्यात आला आहे. चारपदरी रस्ता व सर्व्हीस रस्त्या मध्ये १० फुट खोलगट जमिन असुन रस्त्या खालुन जाणारे छोटे नाल्याचे पुल उघडे असुन पुलाच्या भिंती रस्त्या सपाट असुन कुठलेही सुचना फलक नसल्याने वाहन चालकांना दिसत नसुन जवळ आल्यावर एकाएक दिसत असल्याने वाहन चालकांचे संतुलन बिघडुन वाहने खडयात जावुन अपघात हो़ऊन निर्दोष वाहन चालकांना गंभीर जख्मी होऊन काहीना शरीराचे काही भाग, हात, पाय गमवावे लागते. टेकाडी बंद टोल नाक्या जवळील तार कंपनी जवळ एक, टोल नाका पलीकडे वराडा बस स्टाप च्या पहिले निरमा कंपनीच्या आजुबाजुला दोन असे उघडे पुल असुन याच सर्व्हीस रस्त्यावर वराडा बस स्टाप, पेट्रोल पंप असल्याने स्थानिय व बाहेरील ये-जा करण्यास वाहना ची चांगलीच वर्दळ असुन चारपदरी रस्ता व सर्व्हीस रस्त्या मधिल उघडे पुल अपघातास निमत्रंण देत कित्येक दुचाकी, चारचाकी वाहनाचा अपघात होऊन काही लोक जख्मी तर काहीचे हाथ, पाय गमवावे लागलेले आहे. यापुढे या उघडया पुलामुळे अपघात होऊ नये म्हणुन महामार्ग प्राधिकरण अधिकार्यांनी रस्ता बनविणार्या कंपनी कडुन चारपदरी रस्ता व सर्व्हीस रस्त्या मधिल उघडया पुलाची भिंत उंच करून सभोवताल बॅरिकेट लावुन सुचना फलक लावावे. या पावसाळया च्या दिवसात हे नाले पाण्यानी भरून असल्याने त्याची खोली लक्षात येत नाही तसेच पावसात हे दिसत नसल्याने यावर तात्काळ उपाय योजना कराव्या अन्यथा अपघात झाल्यास वाहन चालकांना नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी स्थानिय वाहनचालक व प्रवाश्याच्या चर्चेतुन सामोर येत आहे.