*कन्हान नदीच्या डोहात बुडून चार युवकांचा दुर्दैवी अंत*
*एकाचे शव हसँतगत तर तीघांचा शोध सुरु*
मुख्य संपादक – किशोर ढूँढेले
सावनेरः तालुक्यातील पोलीस स्टेशन खापा अंतर्गत येणाऱ्या मौजा वाकी शिवारातील कन्हान नदीकडे आज दिनांक ,22 जुन रोजी नागपूर शहरातील तौफिक आशिक खान वय ,16,प्रविन गलोरकर वय ,17,अतेश शेख नासीर वय 17,आरीफ अकबर पटेल वय ,16 राहणार सर्व नागपुर व इतर चार मुले सर्व मिळून वाकी येथे येऊन वाकी शिवारातील कन्हान नदीच्या पात्रात आंघोळी करिता दुपारी एक वाजताच्या सुमारास.तौफिक ,प्रविन,अतेश,आरीक. हे नदीपात्रात उतरले व इतर मित्र नदीकाठी थांबले होते या चौघांना नदी पात्रात असलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते नदीपात्रातील पाण्याच्या डोहात बुडाल्याने मरण पावले असून स्थानिक भोई लोकांच्या मदतीने एकाचे शव नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले असून इतर मृत्यु कांचा शोध खापा पोलीस स्थानिक भोई लोकांच्या व एस.डी.आर.एफ. तीनच्या मदतीने शोध घेत आहे*
*घटनास्थळी पोलिस खापा पोलीस निरीक्षक अजय मानकर व खापा पोलीस स्टेशनचा स्टॉप नजर ठेऊनआहे.सदर ठीकाणी यापूर्वी ही नदिच्या पात्रात बुडून अनेकांनी आपले प्राण गमावले आहे व या ठिकाणी खापा पोलिसांनी धोक्याचे सुचना फलक सुध्दा त्याकडे दुर्लक्ष करुण मोठ्या संख्येने युवक आपले प्राण गमवत आहे याची खंत पोलीस निरीक्षक अजय मानकर यांनी व्यक्त केली असुन उर्वरित तीन युवकांच्या मु्तदेहाचा शोध घेतल्या जात आहे.रात्रीचा आंधारात शोधकार्य कठीण असल्याने उद्या सकाळी परत शोधकार्य सुरु करण्याची शक्यता आहे*