*सावनेर येथे एलआयसी एजंट फेडरेशन चा स्थापना दिवस साजरा*
*मुख्य संपादक -किशोर ढुंढेले *
*सावनेर येथील गडकरी सभागृहात लाइफ इन्शुरन्स एजंट फेडरेशन ऑफ इंडिया (लियाफी) च्या सावनेर शाखेतर्फे 54 वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला फेडरेशनचे माजी जिल्हाध्यक्ष शेषराव धुंदड, सावनेर शाखाध्यक्ष धनराज निकोसे , सचिव विष्णू ठाकरे, माधवराव महल्ले, भीमराव गुडदे, आनंदराव वासनिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गांधी जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम घेतल्याने कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून महात्मा गांधी लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.*
*कार्यक्रमाला उपस्थित शेकडो एजंटांना त्यांच्या हितासाठी फेडरेशन काय काय काम करत आहे. हे समजावून सांगण्यात आले. तसेच एजंटांना आजच्या काळात बाजारात काम करतेवेळी कोण कोणत्या त्रासाला समोर जावे लागते. यावर प्रकाश टाकण्यात आला. एजंटांच्या हितासाठी फेडरेशनने विविध मागण्या भारत सरकार व एलआयसी प्रशासनासमोर मांडल्याचे मंचावर उपस्थित मान्यवर यांनी उपस्थित एजंटांना आपल्या संबोधनातून समजावून सांगितले.*
*यावेळी काही एजंटांनी सावनेर शाखेत काम करतेवेळी होत असलेल्या त्रासाबद्दल प्रश्न उपस्थित केले. पदाधिकाऱ्यांनी सर्व एजंटांची तक्रार ऐकून त्यावर शाखा व्यवस्थापनातील पदाधिकाऱ्यांसोबत विविध प्रश्नावर चर्चा करून तोडगा काढल्याचे सांगितले.*
*कार्यक्रमाला उपस्थित एजंटांच्या मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने शाखेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अविनाश दियेवार, संजय उके, प्रशांत घारड या एजंटांचा सत्कार करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेणाऱ्या कलाकारांचा ही सत्कार करण्यात आला.*
*प्रास्ताविक धनराज निकोसे, मंच संचालन धवल डुमरे, आभार प्रदर्शन दीपक निखाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोनल बागडे, पारेश्वर निंबाळकर, रितेश सुर्यवंशी, रंजन महाजन, भरत लोधी, कैलास पाटील, रितेश निर्मल आदींनी सहकार्य केले.*