*पारशिवनी तालुक्यातील वे.को.ली प्रभावी क्षेत्राच्या विविध विषयावर चर्चा*
*समस्याचे लवकरात लवकर करू – मनोजकुमार वेकोलि सीएमडी*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – वेकोलि मुख्यालयात मा मंत्री सुनिल बाबु केदार हयांनी वेकोलि वरिष्ठ अधिकार्यांशी चर्चा करून पारशिवनी तालुक्यातील वेकोलि प्रभावित विविध विषयाचे लवकरात लवकर निराकरण करण्याचे वेकोलि अधिकार्यांनी आश्वस्त केले.
महाराष्ट्र राज्याचे पशु संवर्धन, दुग्दव्यवसाय, क्रीड़ा व युवक कल्याण मंत्री मा. सुनील बाबु केदार यांनी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ रश्मीताई श्यामकुमार बर्वे यांचा निवेदनावर पारशिवनी तालुक्यातील वेकोलि मुळे प्रभावित गोंडेगाव, कांन्द्री, टेकाडी, घाटरोहणा, टेकाडी (कोळसा खदान) या क्षेत्राचा दौरा करण्यात आला होता. या दौऱ्यात मुख्य रूपी ४ नंबर दफाई पुनर्वसन, गोंडेगाव पुनर्वसन, घाटरोहना पुनर्वसन, सी,एस,आर फंडातुन क्षेत्रात विविध विकस कामे, कांन्द्री येथे खेळण्याचे मैदान व आठवड़ी बाजारची सुविधा अश्या विविध विषयाची तपासणी व पाहणी मंत्री महोदयांनी केली होती. या सर्व विषयावर दिनांक १८ जुन २०२१ रोजी मंत्री सुनील बाबु केदार यांचा अध्यक्षते व सौ रश्मीताई बर्वे यांच्या उपस्थितीत श्री मनोज कुमार वे.को.ली अध्यक्ष सह प्रबंध निदेशक यांच्या सोबत वे.को.ली मुख्यालय नागपुर येथे चर्चा करण्यात आली.
मा. सुनील बाबू केदार यांनी वे.को.ली प्रशाशन समोर मांडलेल्या सर्व समस्या लवकरात लवकर सोडविन्यात यावे असे निर्देश दिले. वेकोलि अधिकाऱ्यांनी सकारात्मक उत्तर देते लवकरात लवकर सर्व समस्यां चे निराकरण करू असे आस्वस्त केले आहे. याप्रसंगी आमदार आशीष जैस्वाल, माजी आमदार एस. क्यु जामा, इंटक नागपुर क्षेत्र अध्यक्ष नरेशजी बर्वे, उपवि भागीय अधिकारी, तहसिलदार, वेकोलि अधिकारी व संबंधित गावांचे सरपंच उपस्थित होते.