*कन्हान शहरात व परिसरात महिलांनी साध्या पद्धतीने केले वटसावित्री उत्सव पूजन*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान शहरात व परिसरात महिलांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करुन अनेक ठिकाणी वट वृक्षाच्या झाडाची पुजा अर्चना करुन वटसावित्री उत्सव साजरा करण्यात आला .
हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. अनेक ठिकाणी हे व्रत जेष्ठ अमावस्येच्या दिवसापासून ते जेष्ठ पौर्णिमेच्या तिथीपर्यंत केले जाते. वटवृक्षाची पूजा करुन सावित्रीने आपला पती सत्यवान यांच्या प्राणाची रक्षा केली होती. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात . त्याच अनुषंगाने कन्हान शहरात व परिसरात प्रत्येक ठिकाणी महिलांनि साध्या पध्दतीने वटसावित्री पौर्णिमाचे औचित्यसाधून वटवृक्षाचे पूजन करून महिलां भगिनींनि आपल्या पतीच्या दीर्घाआयुष्यासाठी उपास आराधना केली, हे पूजन यंदा महिलांनी कोरोनामुळे साध्या पद्धतीने साजरे केले, हे व्रत केल्याने आपल्या पतीचे आयुष्यात वाढ होते.अशी महिलां भाविकांची व्याख्या आहे, हे व्रत करून सावित्रीने तिचे पती सत्यवान यांना वढाच्या झाडाखाली एमलोकांतूंन परत मिळविले म्हणुन हे व्रत महिला करतात अशी सुद्धा श्रद्धा आहे. वटपौर्णिमा म्हणजे सत्यवान आणि सावित्री यांची पौराणिक कथा. पती-पत्नीचे नातेसंबंध दृढ व्हावे ही या सणामागील संकल्पना. पण त्याचबरोबर वटपौर्णिमेचा संदेश म्हणजे विचारातुन वृक्ष संवर्धन व्हावे व पर्यायाने पर्यावरण जोपासत असतांना निर्सगाचा समतोल राखला जावा. झाडे लावा, झाडे जगवा . कन्हान येथे कन्हान पांधन रोड , बीकेसीपी शाळा , प्राथमिक आरोग्य केंन्द्राच्या गार्डन मध्ये , कांन्द्री संताजी नगर , शितला माता मंदिर कांन्द्री , व हनुमान नगर वाचनालय चे पटांगणात , इतर विविध ठिकाणी महिलांनी वट वृक्षाच्या झाडाचे पुजन करुन वट सावित्री उत्सव साजरा करण्यात आला