*शाहू महाराज जयंती संपन्न*
वर्धा प्रतिनिधी – पंकज रोकडे
वर्धा – 26 जून 2021 ला संभाजी_ब्रिगेड आर्वी द्वारा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने रेस्ट हाउस आर्वी येथे सायंकाळी मोठ्या उत्साहात अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून सुरवात करण्यात आली. शाहू महाराज व त्यांच्या विचारांवर प्रकाश टाकत बंडू भाऊ पाचोडे व संजय देशमुख सर यांनी त्यावेळी मार्गदर्शन करून आपले विचार व्यक्त केले. महापुरुषांचे विचार डोक्यात घेऊन चाललो तर कुणाचाच पराभव होने नाही ही शिकवण संभाजी ब्रिगेड ने समाजाला दिली.
यावेळी अध्यक्ष रोहन हिवाळे, अर्चनाताई चापले (अध्यक्ष महिला आघाडी), वैष्णवी जगताप (युवती आघाडी), नरेशभाऊ निनावे, संघटक गणेशजी चापले, पवनदादा होरे, कविताताई आसोले, निखिल लंगडे, लक्ष्मणजी चातूरकर, आकाश हीरेखन, सविताताई चतुरकर, एकता जगताप, प्रियंकाताई गुजर, पूनमताई मैदानकर, पल्लवीताई केदार, ध्यानेश्वर पोहरकर, सौरभ देशमुख इत्यादी उपस्थित होते.