*कंटेनर ट्रक मध्ये ३४ गोवंश बैल कोबुन भरून नेतांना पकडुन ३४ जनावरांना दिले जिवनदान* *परिवेक्षाधिन पोलीस उपअधिक्षक सुजितरुमार श्रीरसागर यांची कारवाई* *चार आरोपीना पकडुन २३ लाख ४० हजार रूपयामचा मुद्देमाल जप्त*

*कंटेनर ट्रक मध्ये ३४ गोवंश बैल कोबुन भरून नेतांना पकडुन ३४ जनावरांना दिले जिवनदान*

*परिवेक्षाधिन पोलीस उपअधिक्षक सुजितरुमार श्रीरसागर यांची कारवाई*

*चार आरोपीना पकडुन २३ लाख ४० हजार रूपयामचा मुद्देमाल जप्त*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत बोर्डा टोल नाका जवळ परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक सुजितकुमार श्रीरसागर सह पोलीस चंमुनी नाकाबंदी करीत मध्यप्रदेश येथुन येणार्या कंटेनर ट्रक ला थांबवुन वाहनाची तपासणी केली असता कंटेनर मध्ये ३४ गोवंश बैल अत्यंत क्रुर व निर्दयतेने कोंबुन आणि आखुड दोरखडा ने बांधुन नागपुर कडे कत्तली करीता घेवुन जातांना मिळुन आल्याने सरकार तर्फे फिर्यादी नापोशी मुकेश हिवाळे यांच्या तक्रारीवरुन सदर कार्यवाही परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक सुजितकुमार श्रीरसागर यांचा मार्गदर्शनात करण्यात आली आहे.


प्राप्त झालेल्या माहिती नुसार गुरुवार दिनांक.२४ जुन २०२१ ला सायंकाळी ५ ते ६ वाजता च्या सुमारास परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक सुजितकुमार श्रीरसागर यांच्या मार्गदर्शनात पोसीस कर्मचार्यांच्या चंमुनी बोर्डा टोल नाका जवळ नाकाबंदी करीत असतांना यातील ट्रक क्रमांक. एच आर ७३ – ५६७३ कंटेनर ट्रक ला नाकाबंदी च्या ठिकाणी थांबवुन वाहनाची तपासणी केली असता ट्रक कंटेनर मध्ये ३४ गोवंश बैल अत्यंत क्रुर व निर्दयतेने कोंबुन आणि आखुड दोरखडाने बांधुन आरोपी १) शाहरुख घाशी खाॅं वय २१ वर्ष राहणार. इस्लापुरा २) शाहदत अली मिश्री खाॅं वय २२ वर्ष राहणार. इस्लामपुरा ३) सद्दाम हुसैन बाबु खान वय २५ वर्ष राहणार. इस्लामपुरा ४) मुमिन खान नजिर खान वय ३१ वर्ष राहणाय. ग्राम पतापुरा दिग्गी यांनी संगणमत करून मध्यप्रदेश येथुन नागपुर येथे कत्तली करीता कंटेनर ट्रक मध्ये भरून अवैद्य वाहतुक करित घेवुन जातांना मिळुन आल्याने सरकार तर्फे नापोशी मुकेश हिवाळे यांच्या तक्रारी वरुन चार ही आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक . २१७/२०२१ कलम ११(१)( अ) (ड) (इ) (ए़प) (आय) प्रा.छ.प्र ५ (अ) ९ म.प्रां.स.का सह ३४ भांदवि कलम १८४ मोवाका अन्वये गुन्हा नोंद करून आरोपी जवळुन काळ्या पांढऱ्या रंगाच्या ३४ गोवंश बैल प्रत्येकी १०,००० रुपये प्रमाणे ३,४०,००० रुपये , ट्रक कंटेनर निळ्या रंगाच्या टाटा कंपनीचा किंमत २०,००,००० रुपये असा एकुण २३,४०,००० रुपयाचा मुद्देमाल मिळुन आल्याने जप्त करून ताब्यात घेऊन ३४ गोवंश बैल जनावरांना जिवनदान देण्यात आले. सदर कारवाई परिवेक्षाधीन पोलीस उपअधिक्षक सुजितकुमार श्रीरसागर स्वत: उपस्थित राहुन त्यांचा मार्गदर्शनात पोलीस कर्मचार्यांच्या सहकार्याने करण्यात आली असुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे नापोशी राहुल रंगारी हे करीत आहे.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …