*शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणाऱ्या दोन आरोपी विरूध्द गुन्हा दाखल*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत टेकाडी गावात एम. इ.सीबी विद्युत बिलाची वसुली करिता गेलेल्या महिला कर्मचार्यास अश्लील शिवीगाळ करून काठी घेऊन अंगावर धावुन शासकीय कामात अडथळा करणाऱ्या दोन आरोपी विरूध़्द कन्हान पोलीसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे .
प्राप्त माहिती नुसार गुरुवार (दि.२४) जुन २०२१ ला फिर्यादी अनीता भिमराव कोतरे वय ४२ वर्ष राहणार. खापरखेड़ा या एम. एस.सी बी इलेक्ट्रीक वसुली करिता गेली असता आरोपी १) अशोक पिलाजी पाटील २) प्रवीण अशोक पाटील दोन्ही राहणार टेकाडी यांनी अश्लील शिवीगाळ करून धक्का-मुक्की करित अंगावर लाकडी काठी घेऊन धावुन आल्याने शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी फिर्यादी अनीता भिमराव कोतरे यांचे तक्रारी वरून पोलीस स्टेशन कन्हान येथे आरोपी विरुद्ध कलम ३५३ , ३४ भांदवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असुन सदर आरोपीतांचा शोध घेणे सुरु असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांचा मार्गदर्शनात खुशाल रामटेके हे करीत आहे.