*शेतकर्यां शेतीवर जाण्यासाठी* *काजळी-धामनगाव जोड नदीवरील पुलाच्या प्रतिक्षेत शेतकरी!* *पालकमंत्री सुनिल केदार यांचे कडे मागणी*

*शेतकर्यां शेतीवर जाण्यासाठी*

*काजळी-धामनगाव जोड नदीवरील पुलाच्या प्रतिक्षेत शेतकरी!*

*पालकमंत्री सुनिल केदार यांचे कडे मागणी*

कोंढाळी वार्ताहर – दुर्गाप्रसाद पांडे
नागपुर –  वर्धा सीमेलगच्या कारंजा (घा)तालुक्यातील काजळी च्या शेतकर्यांना आपल्या शेतावर जाने तसेच आपल्या पशुधनांना(जनावरांना)चलाई व शेती वर जाण्यां करीता काजळी- गावालगत काजळी-धामनगाव ला जोडणार्या नदीवर पुलाचे बांधकाम करन्याची मागणी स्थानिक शेतकरी व गावकर्यांनी केली आहे । काजळी या गावचे 123शेतकर्यांची शेती काजळी-धामनगाव जोडणार्या नदी पलीकडे आहे, तर काजळी- चीखली या गावाला जोडणार्या कामाचा नाल्या पलिकडे 105शेतकर्यांची शेती आहे ।

या दोन्ही नदी नाल्याला पुराच्या प्रसंगी तसेच नाल्यांना पाणी राहत असल्याने शेतकरी वर्गाला आपले पेरणी, निदाई, डवरीणी, याकरीता नदी पलिकडेच जावे लागते पुर प्रसंगी शेतकरी शेतमजुर व शेतकर्यांचे पशुधन दोन्ही नदी च्या दुसर्या बाजूला अडकून पडावे लागते, या करीता स्थानिय शेतकरी यांचे मागणी नुकसान ग्राम पंचायत काजळी कडून अनेकदा आज पर्यंत माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी आमदार अमर काळे व विद्यमान आमदार दादाराव केचे यांचे कडे मागणी करून ही या दोन्ही नदीवर(मोठे नाले) पुलांचे बांधकाम मंजूर करन्यात आले नाहीत। या करीता आता पालकमंत्री सुनिल केदार यांचे कडे सोबतच विद्यमान आमदार यांचे कडे पुलांचे बांधकामा बाबद मागणी करण्यात आली असुन या मा मागणी कडे जिल्हाधिकारी , जि प सी ई ओ , मुख्य अभियंता बांधकाम यांनी ही लक्ष द्यावे अशी मागणी सरपंच सुनील धारपुरे व शेतकर्यांनी केली आहे।

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …