*१५ दिवसांच्या आत टेकामंडवा येथिल आरोग्य उपकेंद्र कार्यान्वित न झाल्यास मुर्दा आंदोलन करणार*
*शिवसेना नेत्या सिंधू जाधव यांच्या खणखणीत इशारा*
जिल्हा प्रतिनिधि – मूजम्मिल शेख
जिवती:-जीवती तालुक्यातील टेकामांडवा येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची निर्मिती करण्यात आली असून, या बांधकामावल लांखोचा निधी खर्च करण्यात आला आहे. पण १५ वर्षांनंतर या इमारतीत आरोग्य सेवा सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामिण भागातील जनतेला वैद्यकीय सेवेपासून वंचित राहावे लागत आहे. सध्या या इमारतीत जनावरांचे वास्तव असल्याने सेनेच्या तालुका संघटिका सिंधूताई जाधव चांगल्याच आक्रमक झाल्या आहे. आरोग्य केंद्र कार्यान्वित करा अन्यथा मुर्दा आंदोलन करण्याचा इशारा जाधव यांनी दिला आहे.
जिवती तालुका हा अत्यंत मागासलेल्या असुन जनता दुर्गम व डोंगराळ भागात वास्तव्य आहे. दऱ्याखोऱ्यामुळे जनता पायाभूत सुविधेपासून वंचित आहे. त्यातच सरकारी योजना देखील जनतेपर्यंत पोहोचत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे जनतेला अनेक समस्येला सामोरे जावे लागत आहे. तसेच जनतेला आरोग्य सेवा मिळावी याकरिता टेकामाडंवा गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची इमारत बांधण्यात आली व यावर लाखोंचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र १५ वर्षांनंतर देखील केंद्र सुरू न झाल्याने सध्या इमारतीत जनावरांचे वास्तव आहे. अधिकाऱ्याच्या दुर्लक्षितपणामुळे जनतेला वैद्यकीय सेवेपासून वंचित राहावे लागत आहे असल्याच्या आरोप सिंधूताई जाधव यांनी केला आहे.