*कन्हान येथे घरफोडी च्या गुन्ह्यात वाढ , नागरिकांत भीतीचे वातावरण*
*आरोपी पसार , ग्स्त वाढविण्याची मागणी*
कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर
कन्हान – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत दिवसन दिवस घरफोडी च्या गुन्ह्यात वाढ होत असल्याने नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन अज्ञात आरोपी कन्हान पोलीसांच्या ताब्यातुन बाहेर रस्त्यावर फिरत असल्यावर ही कन्हान पोलीस आतापर्यंत घरफोडी च्या आरोपींना पकडण्यात अपयशी ठरली आहे . वारंवार कन्हान शहरात व परिसरात घरफोडी होत असल्याने नागरिकांनी कोणाच्या भरोस्यावर घर सोडुन बाहेर जावे . असा प्रश्न निर्माण होत दिवस आणि रात्र पोलीस ग्रस्त वाढविण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे .
*कांद्री येथे ६५, ७०० रूपयाची घरफोडी.*
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत कांन्द्री बस स्टाॅप जवळील रहिवासी पुजा रविंन्द्र पोटभरे यांचा घरी अज्ञात चोरांनी घरफोडी करून सोने, चांदीचे दागिने ६५,७०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याने कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे .
प्राप्त माहिती नुसार गुरुवार दि.२४ जुन २०२१ ला रात्री ८:०० वाजता दरम्यान पुजा रविंन्द्र पोटभरे वय २८ वर्ष राहणार. कांन्द्री बस स्टाॅप जवळ घराला कुलुप लावुन आईच्या घरी गेले असता शुक्रवार दि. २५ जुन २०२१ ला रात्री १० ते ११ वाजता दरम्यान अज्ञात चोरांनी कुलुप तोडुन घराच्या आत प्रवेश करून आलमारी मध्ये ठेवलेले सोने, चांदीचे दागिने एकुण किंमत ६७,५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याने कन्हान पोस्टे ला फिर्यादी पुजा रविंन्द्र पोटभरे यांच्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे.
*खेडी खोपडी येथे अज्ञात आरोपीने केली घरफोडी*
कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत खेडी खोपडी येथे फिर्यादी चंन्द्रकला रघुनाथ वराडे यांच्या घरी अज्ञात चोरांनी आत प्रवेश करुन दोन सिलेंडर सह २५,००० रुपये चोरून नेल्याने फिर्यादी यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे.
प्राप्त माहिती नुसार शुक्रवार २५ जुन २०२१ ला फिर्यादी चंन्द्रकला रघुनाथ वराडे वय ५० वर्ष राहणार. खेडी खोपडी हे काही काम असल्याने बाहेर गेले होते. घराला कुलुप लावले पाहुन अज्ञात चोरांनी घराचे कुलुप तोडुन आत प्रवेश करुन लोखंडी आलमारीचे लाॅकर तोडुन पासबुक मध्ये ठेवलेले २०,००० रुपये रोख व दोन सिलेंडर असा एकुण २५,००० रुपयाचा मुद्देमाल चोरुन नेल्याने फिर्यादी चंन्द्रकला रघुनाथ वराडे यांच्या तक्रारी वरुन कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ४५७ , ३८० अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अरुण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस येशु जोसेफ करीत आहे .