*कोरोना मृत कुटुंबांतील सदस्य वारसदारांना शासकीय योजनेत समाविष्ट करून आर्थिक लाभ मिळण्याची मागणी* *प्रशांत बाजीराव मसार सामाजिक कार्यकर्त्यांचे मा. अपर जिल्हाधिकारी शिरीष पांडव यांचा मार्फत मा.मुख्यमंत्र्यांना निवेदन.*

*कोरोना मृत कुटुंबांतील सदस्य वारसदारांना शासकीय योजनेत समाविष्ट करून आर्थिक लाभ मिळण्याची मागणी*

*प्रशांत बाजीराव मसार सामाजिक कार्यकर्त्यांचे मा. अपर जिल्हाधिकारी शिरीष पांडव यांचा मार्फत मा.मुख्यमंत्र्यांना निवेदन.*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – राज्यात कोरोना थैमान पसरल्याने अनेक किती तरी सामान्य लोकांचे मृत्यु झाल्याने त्यांच्या कुटुंबावर उपाशी पोटी राहण्याची वेळ आल्याने शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बाजीराव मसार यांनी नागपूर जिल्हाचे अपर जिल्हाधिकारी शिरीष पांडव यांच्या मार्फत मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे साहेब यांना निवेदन पाठवुन कोरोना मृत कुटुंबांना शासकीय योजनेत समाविष्ट करून आर्थिक लाभ मिळण्याची मागणी केली आहे.
देशात, राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात व शहरात कोरोना चा प्रार्दुभाव अतिवेगाने वाढल्याने अनेक सामान्य नागरिकांचे कोरोना आजाराने मुत्यु झाल्याने त्यांचा कुंटुंबावर उपाशी पोटी राहण्याची वेळ आल्याने दैनंदिन उपजिविका चालविण्याकरीता काम करने अत्यंत गरजेचे झाले असुन ते अश्यातच कोरोना आजाराचा विळाख्यात अडकुण त्यांनी आपल्या औषधा उपचाराकरिता संपुर्ण आयुष्यात कमावलेल्या जमापुंजी (रोख रक्कम) आरोग्यवर लावली पण ते ही कामात न येता त्यांना आपला जिव गमवल्यानंतर त्यांच्या वारसदारांवर दुखाचे डोंगर कोसळल्याने आर्थिक परिस्थिती गंभीर स्वरुपाची झाली आहे. अश्या कुटुंबांना उदारनिर्वाह व जगण्याकरिता वणवण भटकाव लागत असल्याने शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बाजीराव मसार यांनी अपर जिल्हाधिकारी शिरीष पांडव यांची भेट घेत चर्चा करी निवेदन देत यांच्या मार्फत मुख्य मंत्री मा.उद्धव ठाकरे साहेब यांना निवेदन पाठवुन तात्काळ कोरोना काळात मृत झालेल्या कुटुंबाना या संकटातुन बाहेर काढण्याकरिता व त्यांचा वर्तमान, भविष्याकरिता त्यांना विविध शासकीय योजनेत समाविष्ट करून शासकीय योजनाचा लाभ देण्यात यावा तसेच शासकीय आर्थिक मदत ही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ता प्रशांत बाजीराव मसार, राजेश गजभिये, दिपक तिवाडे, मिलिंद मेश्राम, प्रशांत गजभिये, नरेश पाटील, सिद्धार्थ सुखदेव, विपीन गोंडाने, चंदन मेश्राम, कुंदन रामगुंडे, भोला भोयर, आदेश मेंढेकर सह आदि नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …