*सुरेश भोयर यांचा वर गुन्हा दाखल करा*
*पोलीस कारवाई करण्यासाठी आमदार सावरकर यांची नवीन कामठी पोलिस स्टेशन येथे तक्रार*
*भाजपा पदाधिकार्यांचे कामठी नवीन पोलीस स्टेशन च्या ठाणेदारांना निवेदन*
*कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर*
कामठी – कामठी – मौदा विधानसभा क्षेत्राचे आमदार टेकचंद सावरकर यांनी नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीनुसार कामठी चे तहसीलदार अरविंद हिंगे यांनी कामठी नागपुर मार्गावर राज लायन लॉन येथे 14 जून ला सकाळी दहा वाजता राज्याचे दुग्धपालन व क्रीडा मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली कामठी तालुक्यातील विविध विकास कामा संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले असुन या आढावा बैठकीत व्यासपीठावर बसण्यासाठी आमदार टेकचंद सावरकर यांच्याकरिता आरक्षित असलेल्या आनावर माजी जिल्हा परिषद चे अध्यक्ष सुरेश भोयर व माजी जिल्हा परिषद सदस्य अवंतिका लेकुरवाळे बसल्या होत्या त्यामुळे आमदार टेकचंद सावरकर यांना शेवटच्या आनावर बसावा लागले आढावा बैठकीत आमदार टेकचंद सावरकर कामठी तालुक्यातील विविध विकास कामासंदर्भात बोलण्याकरीता माईक जवळ गेले असते मंत्री सुनील केदार यांनी बोलण्यास मनाई केली त्यामुळे मंत्री सुनिल केदार व आमदार टेकचंद सावरकर यांच्यात शाब्दिक चकमक उडाली असता नागपूर जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर उठून आमदार टेकचंद सावरकर यांच्यावर अंगावर धावून आले व शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्या व्हिडिओमध्ये भोयर शिवीगाळ करत असल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याचे आमदार टेकचंद सावरकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे आढावा बैठकीत ज्यांना संविधानानुसार कोणताही अधिकार नसतांना त्यांनी आढावा बैठकीत येऊन आमदार सारख्या लोक प्रतिनिधींना शिवीगाळ देऊन अपमानित केले आहेत आपण तक्रारीची योग्य चौकशी करून सुरेश भोयर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आमदार टेकचंद सावरकर यांनी तक्रारीत केली आहे .
*सुरेश भोयर यांच्या वर गुन्हा दाखल करण्याची मागणी*
कामठी – कामठी – मौदा विधानसभा क्षेत्राचे आमदार टेकचंद सावरकर यांना आढावा बैठकी मध्ये काॅंग्रेस च्या नेत्यांनी शिवगाळ देऊन मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी कामठी तालुका भाजप च्या वतीने नवीन कामठी पोलीस स्टेशन चे ठाणेदार विजय मालचे यांना निवेदन देऊन तात्काळ या प्रकरणाची चौकशी करुन सुरेश भोयर यांच्या वर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे
निवेदनात म्हटले आहे कि , १४ जुन ला कामठी नागपुर मार्गावर राॅज लाॅयन मेरे आयोजित शासकीय आढावा बैठकीत कामठी मौदा विधानसभा क्षेत्राचे आमदार टेकचंद सावरकर यांचे अंगावर धावून शिवीगाळ करून अपमानित करणाऱ्या नागपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांचेवर त्वरित पोलीस कारवाई करण्याची मागणी केली आहे त्वरित कारवाई न केल्यास भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे . या प्रसंगी नागपूर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेता अनिल निधान, कामठी तालुका भाजपाध्यक्ष किशोर बेले, तालुका महासचिव विशाल चामठ ,तालुका भाजप युवा मोर्चा अध्यक्ष किरण राऊत ,कामठी तालुका भाजप महिला आघाडी अध्यक्षा मंगला कारेमोरे ,कामठी शहर भाजपा अध्यक्ष संजय कनोजिया ,कार्याध्यक्ष लाला खंडेलवाल ,नगरसेवक लालसिंग यादव ,प्रतीक पडोळे, कपिल गायधने, प्रमोद वर्णम, राजेश देशमुख ,गोपाल सिरिया कमल यादव, सुनील खानवाणी, सहा मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित