*स्थानिय गुन्हे शाखा पोलीसांनी कांन्द्री घरफोडीचे दोन आरोपी पकडले* *दोन्ही आरोपीचा ३० जुन पर्यंत पीसीआर*

*स्थानिय गुन्हे शाखा पोलीसांनी कांन्द्री घरफोडीचे दोन आरोपी पकडले*

*दोन्ही आरोपीचा ३० जुन पर्यंत पीसीआर*

कन्हान प्रतिनिधि – ॠषभ बावनकर

कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत कांन्द्री बस स्टाॅप येथील रहिवासी फिर्यादी पुजा रविंन्द्र पोटभरे यांचा घरी घरफोडी करणारे दोन आरोपींना नागपुर ग्रामिण स्थानिय गुन्हे अन्वेशन शाखा पोलीसांनी पकडुन कन्हान पोलीसाच्या ताब्यात दिल्याने पुढील कारवाई कन्हान पोलीस करित आहे.


प्राप्त माहिती नुसार गुरुवार दिनांक.२४ जुन २०२१ ला रात्री ८ वाजता च्या दरम्यान फिर्यादी पुजा रविंन्द्र पोटभरे वय २८ वर्ष राहणार. कांन्द्री बस स्टाॅप जवळ घराला कुलुप लावुन आईच्या घरी गेले असता शुक्रवार दिनांक. २५ जुन २०२१ ला रात्री १० ते ११ वाजता च्या दरम्यान अज्ञात चोरांनी कुलुप तोडुन घराच्या आत प्रवेश करून आलमारी मध्ये ठेवलेले सोने, चांदीचे दागिने एकुण किंमत ६७,५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याने कन्हान पोस्टे ला फिर्यादी पुजा रविंन्द्र पोटभरे यांच्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक २२२/२१ कलम ४५४ , ४५७ , ३८० , भादंवि नुसार गुन्हा दाखल असल्याने स्थानिय गुन्हे अन्वेशन नागपुर ग्रामिण चे सहाय्यक पोलीस निरिक्षक अनिल राऊत सह पोलीस कर्मचार्यांनी यातील आरोपीचा शोध घेत आरोपी १) मोहम्म़द आबीद मोहम्मद खलील व २) फैयाज अब्दुल अजिज हयांना रविवार दिनांक.२७ ला पकडुन कन्हान पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. सदर कारवाई स्थानिय गुन्हे अन्वेशन नागपुर ग्रामिणचे सहाय्यक पोलीस निरिक्षक अनिल राऊत, एएसआय लक्ष्मीकांत दुबे, हेड काॅंस्टेबल विनोद, नापेसी प्रणय बनाफर, साहेबराव, शैलेश, भगत सत्या, विरू, दासी आदि ने शिताफितीने करून चोरी करणारे दोन आरोपी पकडले.
कन्हान पोलीसांनी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करून चोरीतील मुद्देमाल न मिळाल्याने व ईतर चोरीत यांचाच हात असल्याची शक्यता वर्तविल्याने या दोन्ही आरोपींचा ३० जुन पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड (पीसीआर) मिळवुन कन्हान पोलीस निरिक्षक अरूण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस पुढील तपास करित आहे.

Check Also

*गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई*

🔊 Listen to this *गणेश वाचनालय में राम गणेश गड़करी की पुण्यतिथि मनाई गई* सावनेर: …