*जमिन मोजणीच्या प्रक्रियेकरिता मा. जिल्हाधिकाऱयांनी लावली संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक*

*जमिन मोजणीच्या प्रक्रियेकरिता मा. जिल्हाधिकाऱयांनी लावली संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक*

चंद्रपूर : ग्रामपंचायत दुर्गापूर अंतर्गत असलेल्या वार्ड क्रं. ३ मधील २२.२५ एकर जमीन सन २०१९ मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे मानीव गावठान विस्ताराकरिता संपादित करण्यात आली आहे. सदर जमिनीवर मागील ३५ वर्षांपासून अंदाजे ४००० नागरिक राहत असुन न्यायालयीन प्रक्रियेमुळे सर्व मूलभूत सुविधापासून वंचित होते, परंतु आता सदर जमीन शासनाने संपादित केली असल्याने शासन निर्णयाप्रमाणे तात्काळ सदर जमीनीचा अभिण्यास तयार करून स्थानिक राहिवासीयांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे, त्यानंतर ग्रामपंचायत दुर्गापूर द्वारे व इतर विभागाद्वारे मुलभूत विकासकामे तातडीने करावे या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्याचे मंत्री तथा चंद्रपूर जिल्हा संपर्कमंत्री मा.ना. प्राजक्त तनपुरे साहेब यांना दिनांक ०३ जुन २०२१ रोजी ग्रामपंचायत पदाधिकाऱयांनी मा. राजेंद्रजी मेश्राम यांच्या नेतृत्वात प्रत्यक्ष भेटुन लेखी निवेदन दिले होते त्याअनुषंगाने मा. मंत्री महोदयांनी केलेल्या लेखी सुचनेनुसार दिनांक १६ जुन २०२१ रोजी मा. जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांच्या दालनात शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेट घेऊन सदर सर्व विषयांवर सविस्तर चर्चा केली होती.
त्याअनुषंगाने आज दिनांक २८ जुन २०२१ रोजी मा. जिल्हाधिकारी महोदयांनी संबंधीत विभागाच्या सर्व अधिकाऱयांची या विषयासंदर्भात बैठक लावली होती. सदर बैठकीत मा. जिल्हाधिकारी साहेब यांच्यासह मा.निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रपूर, मा. मुख्य कार्यपालन अधिकारी, जिल्हा परिषद, मा. उपविभागीय दंडाधिकारी चंद्रपूर, मा.अधीक्षक, महसूल विभाग, मा. तहसीलदार चंद्रपूर, मा. संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती, मा.प्र.नगररचनाकार, नगर रचना विभाग, मा. उपअधीक्षक, भुमी अभिलेख कार्यालय हे सर्व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी शासन निर्णयाला अनुसरून चर्चा करण्यात आली असुन न्यायालयीन प्रक्रिया झाल्यानंतर सण २०१९ ला शासन निर्णय निघून आज जवळपास दोन वर्षांहुन अधिकचा काळ झाला त्यामुळे प्रशासनाने यावर लवकर तोडगा काढणे आवश्यक आहे हे शिष्टमंडळाने अधिकाऱयांच्या लक्षात आणून दिले. त्यावर अतिशय सकारात्मक पद्धतीने मा. जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ आज या विषयाबाबत एक नवीन अहवाल मा. महसूलमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना पाठविणार असल्याचे सांगुन लवकरात लवकर तो मंजूर व्हावा याकरिता देखील पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
तसेच उपस्थित मा.जिल्हाधिकारी साहेब व शिष्टमंडळ यांच्यात झालेल्या चर्चेमध्ये एकूण २२.२५ एकर जमीन भुमी अभिलेख कार्यालयातर्फे कायदेशीर मोजनी केल्यास त्याचा खर्च जवळपास १२ लाख रुपयांपर्यंत येणार असुन या जागेवर बसलेल्या जवळपास ८०० ते ८५० परिवाराने प्रत्येकी १५०० रुपये (एकदा किंवा दोन टप्प्यात) जमा केल्यास व ते पैसे ग्रामपंचायत च्या माध्यमातून भुमी अभिलेख कार्यालयास सुपूर्द केल्यास या जागेची येत्या २ महिन्यात मोजणी होऊन कायदेशीर अभिण्यास तयार होणार व यामुळे पुढच्या ३ – ४ महिन्यात या वार्डा-संदर्भातील नियमानुसार प्रक्रिया पूर्ण करून सर्व विकासकामे सुरू करता येईल या सुद्धा दुसऱ्या पर्यायावर चर्चा करण्यात आली. या पर्याया संबंधाने वॉर्डातील नागरिकांशी चर्चा केल्यानंतर सर्वानी सहमती दर्शविली त्यानंतरच याबाबत मा. जिल्हाधिकारी साहेबांना कळविन्यात येईल. परंतु सदर जमिनीच्या मोजणीचा खर्च हा शासनानेच करावा या करिता प्राधान्य राहील असे शिष्टमंडळाने स्पष्ट केले.
मात्र ज्याअर्थी सर्व कायदेशीर प्रक्रियेसह जमीन मोजणी झाल्यानंतर त्यावर घर असणाऱ्या परिवाराला त्यांच्या जागेच्या क्षेत्रफळानुसार आजच्या रेडिरेकणर प्रमाणे शासनाकडे पैसे जमा करावे लागणार व जे नागरिक पैसे भरण्यास असमर्थ असेल त्यांच्या घरावर बोजा चढविण्यात येईल असे भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना सण २०१९ मध्ये काढण्यात आलेल्या शासन निर्णयात नमूद करण्यात आले तर तेव्हाच सदर जागेच्या मोजणीचा खर्च देखील शासनानेच करावा हे त्या निर्णयात नमूद केलं असते तर आज विकासकामांसाठी जो विलंब होतो आहे तो कदाचित झाला नसता व सर्वसामान्य परिवारांवर सद्यस्थितीत असलेला जमीन मोजणीच्या खर्चाचा देखील भार पडला नसता हे आजच्या बैठकीत चर्चेअंती प्रकर्षाने पुढे आले.
यावेळी बैठकीतील सकारात्मक चर्चेनंतर रेंगाळत असलेल्या या विषयाला आता मात्र अधिक गती मिळणार हा विश्वास निर्माण झाला असून आजच्या शिष्टमंडळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, या जमिनी बाबत सर्व अभ्यासपूर्ण माहिती असणारे तथा सतत पाठपुरावा करणारे माजी सदस्य मा.राजेंद्रजी मेश्राम, ग्रामपंचायत दुर्गापूर सरपंच सौ. पुजाताई मानकर, उपसरपंच मा. प्रज्योतजी पुणेकर, मा. सचिनजी मांडाळे, मा.सारंगजी वाकोडे, मा. सुनीलजी बरीयेकर, सौ. सपना ताई गणवीर व ग्रामपंचायत चे मा. सचिव यांचेसह कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …