*सख्या भावानेच केला भावाचा खुन*
*खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत दहेगाव रंगारी येथील थरार*
विशेष प्रतिनिधि
सावनेर ः तालुक्यातील खापरखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत दहेगाव रंगारी येथील काकडे लेआऊट येथे गीतेश रामदास मानकर वय 29 वर्ष यांच्या राहत्या घरी त्याचा मोठा भाऊ सतीश रामदास मानकर वय 33 राहणार वलणी वेकोली कॉलोनी याने चाकूने गितेशचा गळा व पोटवर गंभीर वार करुण हत्या केल्याचा दुर्दैवी प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली*
*सदर घटना गुरुवारी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान घडलीअसुन मृतक गीतेश मानकर हा त्याचा आई वडीलासह दहेगाव येथे राहतो. त्याचा मजवा भाऊ आरोपी सतीश मानकर हा वलनी आणि मोठा भाऊ जगदीश रामदास मानकर वय 36 वर्ष हा खंडाळा ता पारशिवणी येथे राहतो.*
*मृतक गीतेश चे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. या लग्नाला सतीश चा विरोध होता. यावरून दोघांचा वाद झाला. वाद अति वाढल्याने सतीश ने गीतेश चा चाकूने गळा व पोटावर वार करुन हत्या केली. व हत्या केल्यानंतर गीतेश घरीच झोपला. गीतेश च्या मोठ्या भावाला घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी खून झाल्याची माहिती पोलिसांना दिली. स्थानिक गुन्हे शाखा , खापरखेडा पोलीस घटनास्थळी पोहचुन मु्तदेह उत्तरीय तपासणी करीता रवाना करून पुढील तपास करित आहे*
*लग्नाच्या कारणावरून दोन भावामधे उदभवलेल्या वादातून एकला आपला जीव गमवावा लागला यामुळे क्षेत्रात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण होऊन हळहळ व्यक्त केल्या जात आहे*